आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांना शासनाचा आदेश मिळेल आता एका क्लिकवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीम- बैठकीचे समजले नाही... निरोप मिळाला नव्हता... जीआर पोहोचला नाही.... माहिती नव्हते... आता अशा सबबी यापुढे दांडी बहाद्दर शिक्षकांना देता येणार नाहीत. त्यासाठी शिक्षण विभागाने शासनपातळीवर व्हॉटस् अॅप ग्रुप तयार केले आहेत. कोणतीही मािहती एका क्लिकवर शिक्षकांपर्यंत पोहोचणार असल्याने प्रशासकीय कामाला गती येणार आहे.

प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या बैठका, शिबिरांची माहिती अथवा शैक्षणिक बाबींसंदर्भात आलेले शासनादेश प्रत्येक शिक्षकापर्यंत एका क्लिकवर पोहोचणार आहेत. त्यासाठी व्हॉटस् अॅप ग्रुप तयार करण्यात आले असून, त्यावर केवळ शैक्षणिक माहितीच्या देवाणघेवणीचाच बाेलबाला असणार अाहे. इतर काेणतीही माहिती कोणीही टाकू नये यासाठी ग्रुप अॅडमीनची माहितीही शासनाकडे संकलित करण्यात आली आहे. तालुक्यात प्राथमिक विभागाचे सहा तर माध्यमिकसाठी एक ग्रुप तयार करण्यात आला अाहे.

व्हॉटस्अॅपद्वारे आताचे कामकाज : प्राथमिकविभागासाठी सहा ग्रुपचे अॅडमीन विस्तार अधिकाऱ्यांना तयार करावा लागणार आहे. त्यांच्याकडील बीटातील मुख्याध्यापक शिक्षकांचा त्या त्या ग्रुपमध्ये समावेश करण्यात येणार आहे. गटशिक्षणाधिकारी त्यांच्याकडील माहिती ग्रुप प्रमुखांना देईल. त्यानंतर ग्रुप अॅडमीन ही माहिती त्याच्या ग्रुपवर टाकेल. त्यामुळे केंद्रप्रमुख, शिक्षकांपर्यंत काही क्षणात माहिती पोहोचेल.

असेहोते पूर्वीचे कामकाज : शैक्षणिकआदेश, होणाऱ्या बैठकांची मािहती शिक्षकांपर्यंत जाण्यासाठी गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकाऱ्यांची बैठक घेत होते. विस्तार अधिकारी त्यांच्या अंतर्गत असलेल्या केंद्रप्रमुखांची बैठक घेवून मािहती देत होते. तर केंद्रप्रमुख त्यांच्या केंद्रातील मुख्याध्यापक शिक्षकांची बैठक घेवून मािहती कळवत होते. यासाठी एक ते तीन दिवसाचा कालावधी लागत होता.

खासगी माहितीला राहणार नाही थारा
आपापसात रंगणाऱ्या चॅटिंग इतर बाबींवर मेसेजेसची देवाणघेवाण, यांना या ग्रुपवर थारा मिळणार नाही. त्यामुळे केवळ शिक्षण विभागाचे निरोप, शासनादेश, शिबिरे, प्रशिक्षण यासह महत्वाच्या शैक्षणिक घडामोडींचीच ग्रुपवर चर्चा असेल.

किमान १०० जणांचा ग्रुप
एकाग्रुपवरकिमान १०० जणांचा समावेश आहे. केवळ शिक्षणविभागाच्या माहितीची देवाण घेवाण त्यावर होईल. यामुळे कामकाजाला गती मिळण्यास मदत होणार आहे.'' अंबादास पेंदोर, प्राथमिकशिक्षणाधिकारी,वाशीम गतिमान प्रशासन