आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सणांसाठी सुटी देण्याचे अधिकार आता शाळांना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- सणआणि स्थानिक उत्सवांना सुटी देण्याचे अधिकार आता शाळांना देण्यात आले आहेत. पूर्वी शिक्षण विभागाकडून सुट्यांचे नियोजन होत होते. मात्र, स्थानिक सणवारांच्या सुट्याच मिळत नव्हत्या. त्यासाठी शिक्षण विभागाकडून परवानगी घेताना अडचणी येत होत्या. नेमके हेच शालेय शिक्षण विभागाच्या लक्षात आल्यामुळे शाळांना सुटी देण्याचे अधिकार आता पालक-शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
धार्मिक सणांसाठी सुटी हवी असेल तर ते अधिकार शाळा व्यवस्थापन समिती पालक-शिक्षक संघाला देण्यात आले आहे. राज्यातील विविध संघटनांनी विविध धार्मिक सणांसाठी सुटीची मागणी केल्यानंतर हे अधिकार किंवा सुटीत बदल करण्याचा निर्णय आता शाळांवर टाकण्यात आला आहे. सुटी देत असताना आता आरटीई नियमानुसार पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी २०० दिवस आणि आठशे घड्याळी तास तसेच सहावी ते आठवीच्या वर्गासाठी २२० दिवस आणि एक हजार घड्याळी तास पूर्ण भरणे सक्तीचे असणार आहे.

माध्यमिक शाळा संहिता नियमानुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या सुट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त देता येत नाहीत. तसेच कामांचे दिवस २३० होणे आवश्यक आहेत. मात्र, धार्मिक सणांचे निमित्त साधून विविध संघटना आणि पक्षांकडूून सणांसाठी सुटी देण्याची मागणी होत होती. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने आरटीई नियमांचा आधार घेत शासन निर्णयाद्वारे हे अधिकार शाळा व्यवस्थापन समिती पालक-शिक्षक संघाच्या सहमतीनुसार शिफारशीनुसार स्थानिक मागणीनुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना सुटी द्यावी, असे या निर्णयात म्हटले आहे. तसेच या सुटीच्या काळात कोणत्याही परीक्षांचे आयोजन करण्यात येऊ नये, असेही त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

स्थानिक सणांचा पूर्वी नव्हता समावेश
जिल्ह्यातयात्रेसारखे अनेक उत्सव साजरे होतात. मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून सुट्यांचे नियोजनात स्थानिक सण उत्सवांची नोंद होत नव्हती. त्यामुळे आता हे अधिकार शाळांनाच देण्यात आल्यामुळे सुटी देणे शाळांना सहज सोपे होणार आहे.

शासन निर्णयाचे स्वागत
शाळांनासुट्यांचे अधिकार द्यावे, यासाठी मुख्याध्यापक संघाने पाठपुरावा केला होता. आता शासनाने सुट्यांचे नियोजन करण्याचे अधिकार शाळांना देऊन चांगला निर्णय घेतला आहे. शासन निर्णयाचे स्वागत आहे. या निर्णयामुळे स्थानिक सण, उत्सवांना सुटी देणे शक्य होणार आहे. '' विजयालक्ष्मीवानखेडे, प्राचार्या, केबीजे विद्यालय