आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायो टॉयलेट आता अनेक गावांत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- भारत सरकारच्या इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये अकोल्यातील आर. के. बायो टॉयलेटचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या पेयजल स्वच्छता मंत्रालयाकडून या प्रकल्पाची निवड मान्यता मिळाली आहे. देशातील विविध गावांमध्ये या प्रकारचे बायो टॉयलेट नागरिकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.
ग्रामीण पेयजल मंत्रालयाने डॉ. माशलकर यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने स्वच्छताविषयक नवीनतम, संशोधनात्मक तंत्रज्ञानाची माहिती देशभरातून मागवली. त्यात अंत्री मलकापूर येथील आर. के. बायो टॉयलेटची इनोव्हेटिव्ह टेक्नालॉजी म्हणून निवड करण्यात आली आहे.
स्वच्छ भारत मंत्रालयासाठी गठित करण्यात आलेल्या डॉ. माशलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने स्वच्छताविषयक शोध प्रबंध गणमान्य व्यक्तीकडून मागवले होते. देशभरातून सरकारी संस्था, निमसरकारी संस्था, एनजीओ, सामाजिक संस्था, खासगी कंपन्या, वैज्ञानिकांनी शोध निबंध सादर केले होते. तंत्रज्ञानाचे आयुष्य किती, जागा किती लागणार या सर्व कसोट्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यात अकोल्याच्या आर. के. टेक्नॉलॉजीतर्फे अरविंद देठे आर. के. बायो टॉयलेट हा शोध सादर केला.
जुलै रोजी दिल्ली येथे ग्रामीण पेयजल स्वच्छता मंत्रालयातर्फे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नामदार चौधरी, वीरेंद्रसिंग, पेयजल राज्यमंत्री रामकृपाल यादव, सचिव विजयालक्ष्मी जोशी, सत्यप्रकाश शाहू यांच्या उपस्थितीत समिती प्रमुख डॉ. माशलकर, समिती सदस्यांनी तंत्रज्ञानाची माहिती पाहणी केली. दोन दिवसांच्या कार्यशाळेत निवड करण्यात आलेल्या तंत्रज्ञानात याचा समावेश करण्यात आला आहे. वैज्ञानिक डॉ. भाकरे रणजित पवार यांनी सादरीकरण केले होते. सरकारतर्फे प्रकाशित पुस्तीकेत आर. के. बायो टॉयलेटची माहिती दिली आहे.

शुभविवाहाला देऊ भेट
भारतएक कदमतर्फे या प्रकारच्या टेक्नाॅलॅाजीचे प्रशिक्षण देशातील कोणत्याही व्यक्तीस घेता येते. आपला स्वतंत्र व्यवसायसुद्धा करता येतो. शुभविवाहाच्या वेळी ज्या वधूच्या सासरी शौचालय नसेल तिला मूळ खर्चाच्या किमतीमध्ये शौचालय उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.'' अरविंददेठे, संचालक, आर. के.