आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासगी वाहनांवर पोलिस लिहिल्यास आता कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दुचाकी किंवा चारचाकी गाडीवर पोलिस लिहिले की, रुबाबात गाडी चालवता येते. कुणीही अडवण्याची हिंमत करत नाही. त्यामुळे सर्व काही माफ आणि इतरांना मात्र भुर्दंड, असे प्रकार सुरू आहेत. हे उशिरा का होईना, पण गृहविभागाच्या लक्षात आल्यामुळे तसे परिपत्रक गृहविभागाला काढावे लागले. यापुढे पोलिसांच्या खासगी वाहनांवर पोलिस किंवा तसे चिन्ह दिसले, तर त्यांच्यावर सक्तीची कारवाई करण्याचे परिपत्रक सप्टेंबर रोजी काढले आहे. त्यामुळे आता पोलिसच आपल्या आप्तस्वकीयांच्या वाहनांवर काय कारवाई करतात, हे येणारा काळ सांगेल.

पोलिस नावाचा गैरवापर सर्रास होत आहे. वाहनांवर पोलिस टाकले की, गाडी चोरीला जात नाही किंवा पोलिस अशा वाहनांना अडवून त्यांची चौकशी करत नसल्यामुळे वाहनांवर पोलिस लिहिले जाते. एका पोलिस कर्मचाऱ्याकडे जर चार वाहने असतील, तर सर्वच वाहनांवर पोलिस लिहिल्या जात आहे. हे पोलिस विभागाच्या दृष्टीने शिस्तीचा भंग करणारे आहे. पोलिस अधिकारी, कर्मचारी हे त्यांच्या मालकीच्या खासगी वाहनांवर पोलिस चिन्ह अथवा नेम प्लेट लावतात. अशा प्रकारच्या तक्रारी शासन स्तरावर प्राप्त झाल्या आहेत. ही कृती बेकायदेशीर असून, पोलिस अधिकारी त्यांच्या मालकीच्या खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर पोलिस विभागाचे चिन्ह अथवा पोलिस अशी पाटी लावू नये, अशा सक्त सूचना देण्यात याव्यात. तसेच सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येईल, याची दक्षता घ्यावी. सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे परिपत्रक गृहविभागाचे कक्ष अधिकारी विजय साबळे यांच्या सहीने काढण्यात आले असून, सर्व जिल्हा पोलिसप्रमुखांना पाठवण्यात आले आहे.

भाऊबंदकीच्या वाहनांवर कारवाई करण्याचे आव्हान
पोलिसांचे चिन्ह किंवा वाहनाच्या मागच्या बाजूला पोलिस लिहिण्यात आलेल्या वाहनांची संख्या मोठी आहे, अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळे आपल्याच भाऊबंदकीच्या वाहनांवर कारवाई होते काय आणि तसे आदेश पोलिस अधीक्षक देतात काय, हे दिसून येणार आहे.