आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनटीएस अल्पसंख्याकच्या शिष्यवृत्तीसाठी अर्जांचा ओघ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राष्ट्रीय प्रज्ञा शोध (नॅशनल टॅलेंट सर्च) नॅशनल मुस्लीम अँड मायनॉरिटी कम्युनिटी स्कॉलरशीप (एनएमएमएस) परीक्षांसाठी यावर्षी अर्जांचा ओघ वाढला आहे. दोन्ही प्रकारचे अर्ज दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट ही शेवटची तिथी होती. मात्र, तिला आठवडाभराची मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, आतापर्यंतच्या काळात तीन हजारांवर अर्ज प्राप्त झाल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
खासगी अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यापैकी कोणत्याही शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याला एनटीएसची परीक्षा देता येते. तर केवळ अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी असलेली एनएमएमएस परीक्षा ही त्या-त्या शाळांमधील फक्त अाठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. या दोन्ही परीक्षांमध्ये विशिष्ट गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यातील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीच्या रूपाने शासनातर्फे आर्थिक मदत पुरवली जाते.
एनटीएसची परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जाते. त्यातील पहिला टप्पा आगामी नोव्हेंबरमध्ये पूर्णत्वास जाणार असून दुसऱ्या टप्प्याची परीक्षा मे महिन्यात घेतली जाणार आहे. तर एनएमएमएसची परीक्षा जानेवारीमध्ये घेतली जाणार असून दोन्ही परीक्षांचे अर्ज आत्ताच भरुन द्यावयाचे आहेत. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असल्याने त्यादृष्टीने सर्व शाळांसोबतच पत्रव्यवहार करण्यात आला असून, इच्छुक विद्यार्थ्यांना तांत्रिक सहकार्य करावे, असे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश आहेत.
दोन्ही परीक्षा एनसीईआरटीच्या नियमानुसार घेण्यात येणार
पुण्याच्या म. रा. परीक्षा परिषदेतर्फे एनटीएस एनएमएमएस परीक्षेचे आयोजन केले जाते. एनटीएस उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढे राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेचीही संधी असते. ही परीक्षा एनसीईआरटीच्या नियमानुसार घेतली जाते. दरम्यान दोन्ही टप्प्यांतील परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. गतवर्षी अकोला हजारांवर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
^परीक्षेची माहिती प्रत्येक शाळेस दिली. त्यानुसार अर्जही दाखल केले गेले. परंतु अलीकडेच काही शाळांना नव्याने मान्यता मिळाल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांनाही संधी मिळावी म्हणून दोन्ही परीक्षांच्या अर्जांसाठी सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या संधीचा संबंधितांनी लाभ घ्यावा. अर्जांची प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे ती सुटीच्या दिवसांतही सुरू राहणार आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. अरूण शेगोकार, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक, अकोला.
अल्पसंख्यकांना दरमहा ५०० रुपये
एनएमएमएस परीक्षा ही एकाच टप्प्याची असून तिचे आयोजनही पुण्याच्या परीक्षा परिषदेतर्फेच केले जाते. गतवर्षी या परीक्षेत सुमारे दीड हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील १९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जात आहे. ही शिष्यवृत्ती मॅट्रीकपूर्व असल्याने ती दोन वर्षांपर्यंत दिली जाते, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
बातम्या आणखी आहेत...