आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांकडे शस्त्राचा पत्ता नाही अन् म्हणे अाता लढा, क्षेत्रीय अधिकारी झाले बेजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका अधिनियमानुसार झोन समितीला महत्वपूर्ण अधिकार आहेत. त्यामुळेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनाही विविध अधिकार आहेत. मात्र त्यासाठी त्यांना पुरेसा कर्मचारी वर्ग तसेच इतर विविध सुविधा देणे गरजेचे आहे. मात्र अशा कोणत्याही सुविधा तसेच कर्मचारी वर्ग उपलब्ध करुन देता, प्रत्येक विभागाची अथवा कारवाईस प्रशासनाकडून केवळ क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जात असल्याने तूर्तास क्षेत्रीय अधिकारी बेजार झाले असून हातात शस्त्र नसताना लढण्याचे काम क्षेत्रीय अधिकाऱ्यांना करावे लागत आहे.

महापालिकेच्या कामकाजात सुटसुटीतपणा यावा,यासाठी शहराला चार भागात विभागाले आहे. एका झोन मध्ये ठरावीत प्रभागांचा समावेश करण्यात आला आहे. या झोन मध्ये समाविष्ट असलेल्या प्रभागातील समस्या, अडीअडचणी, मालमत्ता कर वसुली यासह विविध कामे या झोन कार्यालयातून केले जाते. इतर महापालिकेतही झोन कार्यालयातून या प्रकारचे काम चालते. मात्र इतर महापालिकेत झोन कार्यालयात क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या हाताखाली सर्व प्रकारच्या विभागातील कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे. त्याच बरोबर विविध सोयी सुविधाही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पुरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे इतर महापालिकेतील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना काम सहजपणे करणे शक्य जाते. 
 
मात्र अकोला महापालिकेत केवळ झोन कार्यालये सुरु करण्यात आली आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. प्रत्यक्षात या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे नगररचना, सार्वजनिक बांधकाम, मालमत्ता कर विभाग, अतिक्रमण विभाग आदी विभागातील अभियंते तसेच इतर कर्मचारी वर्ग उपलब्ध करुन दिलेले नाहीत. त्याच बरोबर संबंधित झोन कार्यालया अंतर्गत येणाऱ्या भागात सुरु असलेले अनधिकृत बांधकाम,स्वच्छता अभियान, शौचालयाचे बांधकाम आदी सर्व प्रकारच्या कामांची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्यावर सोपवलेली असून त्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले जाते. एकाच वेळी या सर्व बाबींकडे लक्ष देणे सहज शक्य होत नाही. त्यामुळे वेळ प्रसंगी संबंधित झोन परिसरात एखादे अवैध अथवा अनधिकृत बांधकाम सुरु असल्यास आणि त्याकडे लक्ष गेल्यास पाणउताराही सहन करावा लागतो. या सर्व प्रकारामुळे क्षेत्रीय अधिकारी वैतागले असून त्यांच्यावर मानसिक ताण वाढला आहे.क्षेत्रीय अधिकाऱ्यांना या कामा बरोबर निवडणुकीचे तसेच क्षेत्रीय अधिकारी या व्यतिरिक्त सोपवलेली अन्य कामेही करावी लागत आहेत. कोणत्याही सुविधा नसताना ही कामे करताना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. 

वाहनांची व्यवस्था नाही : महापालिकेचे क्षेत्रफळ आता २८ वरुन १२४ चौरस किलोमीटर झाले आहे. म्हणजेच एका झोनल अधिकाऱ्याकडे ३१ ते ३२ चौरस किलोमीटरचा परिसर येतो. या संपूर्ण परिसराची पाहणी करणे,त्यावर काम करणे आणि मुख्य कार्यालयात जाणे, बैठकी अटेन्ड करणे आदी कामे करताना या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना वाहने पुरवण्यात आलेली नाहीत. त्यामुळे दुचाकीवरून ही कामे या अधिकाऱ्यांना करावी लागतात. तसेच क्षेत्रीय अधिकारी या व्यतिरिक्त सोपवलेली अन्य कामेही करावी लागत आहेत. कोणत्याही सुविधा नसताना ही कामे करताना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. 

वाहनांची व्यवस्था नाही : महापालिकेचेक्षेत्रफळ आता २८ वरुन १२४ चौरस किलोमीटर झाले आहे. म्हणजेच एका झोनल अधिकाऱ्याकडे ३१ ते ३२ चौरस किलोमीटरचा परिसर येतो. या संपूर्ण परिसराची पाहणी करणे,त्यावर काम करणे आणि मुख्य कार्यालयात जाणे, बैठकी अटेन्ड करणे आदी कामे करताना या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना वाहने पुरवण्यात आलेली नाहीत. त्यामुळे दुचाकीवरून ही कामे या अधिकाऱ्यांना करावी लागतात. 

अभियंते अत्यावश्यक 
संबंधितझोन मध्ये येणाऱ्या प्रभागात नेमकी कोणती कामे सुरु आहेत. यांनी परवानगी घेतलेली आहे की नाही? कोणी अतिक्रमण केले आहे का? यासाठी चार झोन कार्यालयात स्वतंत्रपणे अभियंत्यांची गरज आहे. हे अभियंते झोनच्या सर्व भागाची तपासणी करुन कुठे अवैध बांधकाम सुरु आहे? याचा अहवाल संबंधित झोन अधिकाऱ्याला सादर करु शकतात. त्यामुळे अशा कामांवर कारवाई करणे झोनल अधिकाऱ्याला सहज शक्य आहे.