आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कामात झाला भ्रष्टाचार, काय आढळले चौकशीत, ग्रामरोजगार सेवकाचाही हात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - कागदावरच लाखाे रुपयांची कामे करणाऱ्या चार अधिकाऱ्यांना अाता त्याची चांगलीच किंमत माेजावी लागणार अाहे. या अधिकाऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतरस्त्याच्या कामात वाढीव मूल्यांकन दाखवून बनावट दस्तऐवज बनवून लाखोंची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले अाहे. याप्रकरणी शाखा अभियंता, ग्रामसेवक, पालक तांत्रिक अधिकारी ग्रामरोजगार सेवक दाेषी अाढळले अाहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असून, सहायक गटविकास अधिकारी यांनी बोरगावमंजू पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली आहे.
बोरगावमंजू येथे २०११-१२ २०१४-१५ या कालावधीत शेतरस्त्यांना मान्यता मिळाली हाेती. त्यापैकी शेतरस्त्यांच्या कामावर वाढीव मूल्यांकन दर्शवून अपहार करण्यात अाला आहे. या पाच शेतरस्त्यांच्या कामाचे मूल्यांकन पंचायत समितीचे तत्कालीन शाखा अभियंता प्रकाश रणबावरे, कंत्राटी अभियंता बागडे यांनी ३२,५५,३०५ रुपये मोजमाप पुस्तिकेवर दर्शवून रक्कम काढली. प्रत्यक्षात समितीने कामाची चौकशी केली असता मूल्यांकन १३,१४,८८६ रुपये आढळून आले. त्यामुळे या रकमेतील तफावत १९,४०,४१९ रुपये जास्तीचे आढळून आले. याप्रकरणी शाखा अभियंता रणबावरे बागडे या दोघांनी मोजमाप पुस्तिकेत मूल्यांकन नोंदवून अपहार केला. १९,४०,४१९ वाढीव मूल्यांकन दर्शवून अपहार केल्याचे सिद्ध होते.

ग्रामसेवकाने ही केली दिशाभूल : जुन्याशेतरस्त्याबाबत ३८०.७ मीटर रस्त्याचे काम अपूर्ण ठेवून त्या कामावर अतिरिक्त निधी काढला. सचिवाच्या १५ ऑगस्ट २०१३ च्या ठरावानुसार शेतरस्त्याचे मातीकाम संबंधित शेतकऱ्यांनी लोकसहभागातून करावे असे असताना अंदाजपत्रकात मात्र खोदकामाचे दर घेऊन मंजूर करण्यात आले. यात तत्कालीन ग्रामसेवक जबाबदार आढळला आहे.

चौघांकडून निधीचा अपहार
^शेतरस्ता कामात शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी शाखा अभियंता प्रकाश रणबावरे, ग्रामसेवक संदीप गवई, पालक तांत्रिक अधिकारी बागडे, ग्रामरोजगार सेवक गवई हे चौकशीत दोषी आढळले आहेत. बनावट दस्तऐवज तयार करून यांनी निधीचा अपहार केला आहे. सहायक गटविकास अधिकाऱ्यांनी बोरगावमंजू पोलिसात तक्रार दिली आहे.'' देवीदास बचुटे, गटविकासअधिकारी, अकोला.