आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक: सव्वाशे वर्षांचा इतिहास जपणारी कच्छी मशीद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अकोल्यातील सर्वात पुरातन कच्छी मशीदने १२५ वर्षांचा इतिहास जतन केला असून, येथे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन होते. अकोला कच्छी मशीद ट्रस्टद्वारा संचालित या मशीदमध्ये एकाचवेळी तीन हजार नमाजी नमाज अदा करतात.
अकोला कच्छी मेमन जमातचे अध्यक्ष तथा मशीद ट्रस्टचे अध्यक्ष जावेद झकेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार रमजान महिन्यात विशेष तरावीची नमाजसोबतच अन्य दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन होते. मशीद ट्रस्टमार्फत मदरसाही चालवण्यात येतो. यात ५० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षा ग्रहण करत आहेत. नायब इमाम महम्मद आरिफ रजा बंगाली शिक्षा देण्याचे कार्य करतात. कच्छी मशीदमध्ये विशेषत्वाने पैगंबर महम्मद स. अ. स. यांच्या दाढीच्या पवित्र केसाची जियारत दरवर्षी करण्यात येते. गौसपाक यांच्या पवित्र दाढीची जियारत करण्यात येते.
कच्छी मशीदच्या संचालनासाठी ट्रस्टचे अध्यक्ष जावेद जकेरिया, व्यवस्थापक एजाज सूर्या, सहायक व्यवस्थापक हाजी यासीन बचाव, सदस्य हाजी हनीफ मलक, हाजी फारुक भुरानी आदी पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभते. सर्वात पुरातन ही मशीद अकोलेकरांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
रमजाननिमित्त विद्युत रोषणाई : दरवर्षी पवित्र रमजान महिन्यात या पुरातन मशिदीवर विशेष विद्युत रोषणाई करण्यात येते. महम्मद अली मार्गावर ठिकठिकाणी विविध खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने थाटली जातात, तर सायंकाळी सहानंतर मशीद आकर्षक रोषणाईने बहरते. परिसरात इफ्तारसाठी मुस्लिम समाजबांधवांची मोठी गर्दी होते.
बातम्या आणखी आहेत...