आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: चारचाकी गाडीतून पोलिसांनी ३५ लाख ५० हजार रुपयांची रोकड केली जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- भुसावळ येथून अकोल्यात ३५ लाख ५० हजार रुपये घेऊन येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी माहितीच्या आधारे रेल्वे स्थानक चौकात सापळा रचला. यावेळी एका चारचाकी गाडीची तपासणी केली असता पोलिसांना ३५ लाख ५० हजार रुपये दिसून आले. पोलिसांनी ते जप्त केले असून पुढील कारवाईसाठी आयकर विभागाला पत्र दिले आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांना माहिती मिळाली की, भुसावळहून चारचाकी गाडी अकोल्यात येत आहे. या गाडीमध्ये बेहिशेबी रक्कम आहे. संशयावरून मिळालेल्या महितीवरून त्यांनी रात्रीच्या सुमारास रेल्वेस्थानक चौकात सापळा लावला. यावेळी हॉटेल सतीशसमोर वाहन पोहचताच पोलिसांनी वाहनाला अडवले. वाहनामध्ये पोलिसांना ५०० रुपये नोटा त्याची किंमत ३५ लाख ५० हजार दिसून आले.
 
याविषयी वाहन चालक सचिन सुरेश सोहले याची विचारपूस केली असता त्यांनी आधी समाधानकारक उत्तर िदले नाही. नंतर एका व्यापार्याकडून त्याने धान्य खरेदी केल्याचे सांगून त्याचे पैसे देण्यासाठी आपण अकोल्यात आलो असल्याची माहिती दिली. मात्र त्यासंबंधितचे कागदपत्रे सचिन सोहले सादर करू शकले नाहीत. स्थानिक गुन्हे शाखेने ही रक्कम रामदासपेठ पोलिस ठाण्यात जप्त केली असून पुढील तपासासाठी आयकर विभागाला पत्र दिले आहे. मात्र रक्कमेबाबत कुठले कागदपत्रे सादर करण्यात आली नाही. 

पोलिसांना संशय हवालाची: कारवाइकरून पोलिसांनी जप्त केलेले ३५ लाख ५० हजार रुपये हवालाचे असल्याचा संशय आहे. कारण रकमेबाबतचे कुठलेही दस्तावेज पोलिसांना अद्यापपर्यंत सादर करण्यात आले नाही. त्यामुळे पोलिसांच्या संशयाला पुष्टी येत आहे.  

देण्यासाठीआपण अकोल्यात आलो असल्याची माहिती दिली. मात्र त्यासंबंधितचे कागदपत्रे सचिन सोहले सादर करू शकले नाहीत. स्थानिक गुन्हे शाखेने ही रक्कम रामदासपेठ पोलिस ठाण्यात जप्त केली असून पुढील तपासासाठी आयकर विभागाला पत्र दिले आहे. मात्र रक्कमेबाबत कुठले कागदपत्रे सादर करण्यात आली नाही.
 
पोलिसांना संशय हवालाची 
कारवाइ करून पोलिसांनी जप्त केलेले ३५ लाख ५० हजार रुपये हवालाचे असल्याचा संशय आहे. कारण रकमेबाबतचे कुठलेही दस्तावेज पोलिसांना अद्यापपर्यंत सादर करण्यात आले नाही. त्यामुळे पोलिसांच्या संशयाला पुष्टी येत आहे. 

एलसीबीच्या कारवायांचा सपाटा सुरुच 
स्थानिकगुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांच्या नेतृत्वात गेल्या तीन महिन्यांतील कारवायांचा आकडा मोठा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांनी कपडा बाजारातून एका व्यापाऱ्याकडून ३० लाख रूपये जप्त केले होते. या व्यापाऱ्याने अद्यापपर्यंत कागदपत्रे सादर केली नाहीत. तसेच अनेक फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलिस उपनिरीक्षक रणजितसिंग ठाकूर, पोलिस हेडकॉन्स्टेबल अशोक चाटी, संदीप काटकर यांनी पकडले आहे. 
बातम्या आणखी आहेत...