आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भस्तरीय स्वातंत्र्य करंडक एकांकिका स्पर्धा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य सेनानींच्या स्मृतिप्रीत्यर्थ सिद्धी गणेश प्रॉडक्शनतर्फे १५ ऑगस्टला विदर्भस्तरीय एकांकिका स्पर्धा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात आयोजित केली आहे. स्पर्धेत राज्यात गाजलेल्या विदर्भातील उत्कृष्ट एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे.

स्पर्धेचे उद््घाटन डॉ. सुधीर ढोणे यांच्या हस्ते सकाळी पावणे नऊला होणार आहे. त्यानंतर लगेच स्पर्धेला सुरुवात होईल. स्पर्धेत सकाळी नऊ वाजता निळू फुले आर्ट अकोलाची ‘कुळकर्णी व्हर्सेस देशपांडे’, अद्वैत अमरावतीची ‘शेवटचे स्पंदन’, अंबापेठ अमरावतीची ‘गँग शिवाजीची’, जीवनज्योती अंजनगावची ‘तिसरा साक्षी’, खोब्रागडे महाविद्यालय नागपूरची ‘हटबे’, रंगरसिया नागपूरची ‘पाणीपुरी’, प्राऊड थिएटर्स अकोलाची ‘अॅन् इन्विसिबल वुंड’, गंधर्व अमरावती ‘तमसो मा ज्योतिर्गमय’, विद्याभारती अमरावतीची ‘द वायोलान्स ट्री’, जनकल्याण अकोलातर्फे ‘फुलपाखरू, पतंग आणि ती’, तर नवोदिता चंद्रपूरच्या वतीने ‘गोंद्या आणि कमुचा फार्स’ या एकांकिका सादर होतील. रात्री नऊला त्याच सभागृहात पारितोषिक वितरण सोहळा होईल.

कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राम जाधव, माजी महापौर मदन भरगड, नगरसेवक हरीश आलिमचंदानी, दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. आर. बी. हेडा, प्रा. संतोष हुशे, रमाकांत खेतान यांची उपस्थिती राहील. ही एकांकिका स्पर्धा नि:शुल्क आहे. कलाप्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिद्धी गणेश प्रॉडक्शनचे सचिन गिरी, अनिल कुळकर्णी, कपिल रावदेव, अंकुश गोतमारे यांनी केले आहे.