आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४० रुपयांचा हव्यास; दीड लाख गमावले! पैशांची बॅग चोरट्यांनी केली लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बँकेतून दीड लाख रुपये काढून बाहेर येणाऱ्याच्या मार्गात चोरट्यांनी १० रुपयांच्या चार नोटा टाकल्या. त्या जमा करण्यासाठी दुचाकीवरून उतरण्याचा प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीची दीड लाख रुपये ठेवलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. ही घटना गुरुवारी सकाळी ११.३० वाजता गांधी रोडवरील महाराष्ट्र बँकेच्या समोर घडली.

रमेश गोटीराम राऊत (वय ६०) हे सकाळी ११ वाजता गांधी रोडवरील महाराष्ट्र बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. या वेळी त्यांनी बँकेतून ५०० रुपयांचे तीन बंडल असे दीड लाख रुपये काढले. ते त्यांनी बॅगमध्ये ठेवले, बँकेतून ते बाहेर पडले. पैशाची बॅग त्यांनी दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवली. या वेळी त्यांच्या पाळतीवर चोरटे होते. काही अंतरावर गेल्यावर त्यांच्या वाटेत १० रुपयांच्या चार-पाच नोटा पडल्या होत्या. एवढ्यात एका युवकाने त्यांना तुमचे पैसे पडल्याचे सांगितले. तो पुढे निघून गेला. पैसे दिसल्याचे पाहून रमेश राऊत यांना मोह झाला. ते वाहन थांबवून खाली उतरले पैसे गोळा करू लागले. याच दरम्यान त्यांच्या डिक्कीतील दीड लाख रुपये ठेवलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. पैसे जमा केल्यावर राऊत निघाले, मात्र त्यांना आपले काहीतरी चोरल्याचा संशय आल्याने त्यांनी बॅग बघितली असता ती दिसून आली नाही. त्यांनी तत्काळ सिटी कोतवाली पोलिस ठाणे गाठले. घटनेची तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींच्या वर्णनावरून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले.
बँकेपासूनअसतात चोरटे मागावर : बँकेतकोण जातो, किती पैसे काढतो तो कुठे जातो याची इत्थंभूत माहिती चोरटे काढतात. त्यानंतर ते प्लॅनिंग करतात. या वेळी ते तिघे-चौघे जण असतात. इशाऱ्यावरून मोबाइलवरून ते एकमेकांना लोकेशन देत असतात, असा प्रकार वाशीममध्ये चोरी केलेल्या एका घटनेत दिसून आला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते दृश्य कैदही झाले होते. रामदासपेठ ठाण्याच्या हद्दीतील घटनेच्या तपासात रामदासपेठ पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले होते. असे चोरीचे प्रकार वाशीम जिल्ह्यात चालतात. त्यामुळे या तपासाचेसुद्धा पोलिसांसमोर आव्हान आहे.

यापूर्वीही अशीच घडली होती घटना
रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एअरटेल कंपनीच्या एका कर्मचाऱ्यास लुटण्याचा प्रकार घडला होता. त्याच्या दुचाकीच्या पुढे १०-१० रुपयांच्या नोटा टाकण्यात आल्या होत्या तुमचे पैसे पडले असे सांगून साडेतीन लाख रुपयांची थैली चाेरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणाचा छडा आजपर्यंत लागला नाही.