आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘एक जन्म, एक झाड’ योजनेमुळे जिल्ह्यात वाढणार आता हिरवाई !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- वृक्षिमत्र ए. एस. नाथन यांच्या संकल्पनेतील ‘एक जन्म, एक झाड’ योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून त्यामुळे जिल्ह्याच्या हिरवाईत वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 


घरात नवे मुल जन्माला आले की कुटुंबीयांनी घराच्या परिसरात किंवा गावात उपलब्ध जागेत त्याच्या नावे झाड लावायचे, अशी ही योजना अाहे. त्यासाठी जिल्ह्यात सातही तालुक्यातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स्, एनआरएचएमच्या आरोग्य सेविका आदींचे सहकार्य घेतले जात आहे. त्यासाठी प्रशासनातर्फे बैठका घेण्यात येत असून, त्यात स्वत: नाथन मार्गदर्शन करीत आहेत. केवळ मार्गदर्शनच नाही तर प्रत्यक्ष झाडेही लावली जात आहेत. आतापर्यंत पातूर, अकोला, तेल्हारा, मुर्तीजापूर, बाळापूर, अकोट बार्शिटाकळी या सातही तालुक्यात अनेक सभा घेण्यात आल्या. या सभांमधून सदर योजनेची विस्तृत माहिती देण्यात आली. बाभुळगाव येथे नव्यानेच जन्मलेल्या बाळाच्या आईच्या हस्ते झाडही लावण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक आदी कर्मचारी उपस्थित होते. एक जन्म-एक झाड योजनेमुळे जिल्ह्यात वर्षभरात झाडांच्या संख्येत वाढ होऊन हिरवाई वाढणार असल्याचा अंदाज त्यामुळेच जि.प. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 


‘एक दाखला-एक झाड’योजनाही सुरु
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ए.एस नाथन यांनी प्रारंभी जिल्हा प्रशासनाला लिहिले होते. या शिवाय संबंधितांनी या योजनेमध्ये कसा सहभाग द्यायचा, याची मांडणीही त्यांनी केली होती. ती पटल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)ना निर्देश देत त्यावर अंमलबजावणी सुरु केली. या योजनेसोबतच ‘एक दाखला-एक झाड’ या पूर्वीच्या योजनेवरही अंमल सुरु आहे. 

बातम्या आणखी आहेत...