आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रक दुचाकीच्या अपघातामध्ये एक ठार, एक जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळापूर भरधावट्रक दुचाकीच्या अपघातात एकजण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १५ आॅगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास बाळापूरनजिक असलेल्या तरोडा फाट्याजवळ घडली.

कसीम शहा यासिम शहा, वय १९ वर्ष फिरोज शहा सरवर शहा, वय २३ वर्ष हे दोघे १५ ऑगस्टला एमएच २८, एएच १८०७ क्रमांकाच्या दुचाकीने बाळापूरकडे येत होते. दरम्यान, तरोडा फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एचआर ४७ सी, १७२० क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात वसीम शहा याचा जागीच मृत्यू झाला. फिरोज शहा हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तस्लीम शहा यांच्या फिर्यादीवरून खामगाव पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
बातम्या आणखी आहेत...