आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुपारी एकाला कारावास; सायंकाळी दुसरा जाळ्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - डॉक्टरची नियुक्ती करण्यासाठी आरोग्य उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला ३२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केलेल्या आरोपीस तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवार, २२ जानेवारीला दुपारी ठोठावली. शुक्रवारीच सायंकाळी त्याच विभागातील लिपिकाला एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. हे विशेष.

कृष्णा तुकाराम पराते असे लाचखोर वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. कृष्णा पराते हा आरोग्य उपसंचालक कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून सेवेत होता. १९ एप्रिल २००२ मध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून डॉ. अर्चना टापरे-जावरकर यांची बदली अकोलाच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयात झाली होती. त्यानुसार बदली आदेश घेऊन अर्चना टापरे त्यांच्यासोबत त्यांचे वडील चंद्रकांत जावरकर डॉ. संदीप अरसड आरोग्य उपसंचालक कार्यालयात पोहोचले. ते तेथील वरिष्ठ लिपिक कृष्णा पराते यांना भेटले. मात्र, अकोल्यात जागा रिक्त नसल्याचे पराते याने त्यांना सांगितले. खामगाव शेगाव येथे स्त्रीरोग तज्ज्ञांची जागा रिक्त असल्याचे सांगून तेथे नियुक्ती देतो प्रतिनियुक्तीवर अकोल्यात घेतो. त्याबदल्यात मला दोन हजार रुपये आरोग्य उपसंचालक डॉ. सुभाष वानखडे यांना ३५ हजार रुपये, असे ३७ हजार रुपये द्यावे लागतील, असे डॉ. संदीप अरसड यांना फोन करून सांगितले. ३२ हजार रुपयांवर तडजोड झाली. तक्रारदारांना पैसे द्यायचे नसल्यामुळे डॉ. संदीप अरसड यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार केली. त्यावर एसीबीने सापळा रचला पंच म्हणून मधुकर कलोरे यांना घेऊन डॉ. संदीप अरसड हे ३२ हजार रुपयांची बॅग घेऊन आरोग्य उपसंचालक कार्यालयात गेले होते. या वेळी पैशाची बॅग पराते याने ठेवून घेतली. नंतर बॅगेतून पैसे काढून ते कपाटात ठेवले होते. या वेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात अटक केली. या प्रकरणात रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस अधिकारी वाय. डी. पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. त्यावर आज सुनावणी झाली असता न्यायालयाने आठ साक्षीदार तपासले. सबळ पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपीला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड भरल्यास आरोपीला आणखी एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षाची भक्कमपणे बाजू सरकारी वकील मंगला पांडे यांनी मांडली. विशेष म्हणजे लाचखोराला शिक्षा होण्याची १० वर्षांतील ही उर्वरित.पान
पहिलीचघटना आहे. आरोपीलादाखवली दया : न्यायालयानेआरोपीला दोषी ठरवल्यानंतर तुम्हाला काही म्हणायचे आहे काय, असा प्रश्न केला. त्यावर आरोपीच्या वकिलाने आरोपीची पत्नी मुलगी मानसिक रुग्ण असल्यामुळे कमीत कमी शिक्षेची मागणी केली. त्यावर न्यायालयाने विचार करत आरोपीला तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. लाचखोराला शिक्षा ठोठावल्यामुळे आजपर्यंत जाळ्यात अडकलेल्यांनी या निकालाची धास्ती घेतली आहे.

१३ वर्षांनंतर लागला निकाल
लाचलुचपतप्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवायांच्या निकालात १० वर्षांनंतर आरोपीला शिक्षा झालेली ही पहिली घटना आहे, तर १३ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. त्यामुळे आजवर कारवायांमध्ये अडकलेल्या लाचखोरांना ही चपराक आहे. खटल्यात न्यायालयात संपरीक्षेदरम्यान पोलिस उपअधीक्षक यू. के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड सहायक पैरवी अधिकारी ज्ञानेश्वर सैरिसे यांनी काम पाहिले.