आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव ट्रॅक्टरने कार दुचाकीला उडवले, पत्नी ठार; पती जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीन वाहनांच्या अपघातास कारणीभूत ठरलेले ट्रॅक्टर. - Divya Marathi
तीन वाहनांच्या अपघातास कारणीभूत ठरलेले ट्रॅक्टर.
अकोला- डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर सोमवारी सायंकाळी भरधाव ट्रॅक्टरने कार दुचाकीला जबर धडक दिली. तीन वाहनांमध्ये घडलेल्या या विचीत्र अपघातात महिला जागेवरच ठार तर पती गंभीर जखमी झाला आहे. एमआयडीसी पोलिसांनी तीनही वाहने ताब्यात घेतली असून, ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेतले आहे. 

आनंदराव परशुराम सावळे (वय ७२, रा. उमरी) हे त्यांची पत्नी गीताबाई आनंदराव सावळे (वय ६५) यांना घेऊन एमएच ३० एयु ३९८ क्रमांकाच्या दुचाकीने शिवणी येथून उमरीकडे पीकेव्हीच्या मुख्य प्रवेशद्वारातून जाण्याच्या तयारीत होते, यावेळी अकोल्यावरून जात असलेल्या एम एच ३० जे ८६४१ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. 

या अपघातात दुचाकीवरील गीताबाई खाली पडल्या त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्यांचे पती आनंदराव या ठिकाणी उभी असलेली मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा येथील मुलगी रुबीना बी खा हे दोघे गंभीर जखमी झाले. या जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेउन जखमींना उपचारासाठी पाठवले तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. यावेळी पोलिसांनी ट्रॅक्टर चालक सुभाष उकंडा जाधव याला ताब्यात घेतले. 

गुळपट्टीचेछकडे कारलाही उडवले :ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने आधी दुचाकीला धडक दिली. त्यानंतर एका कारला धडक दिली रस्त्याच्या कडेला असलेल्या छकड्याला धडक दिली. दरम्यान या अपघातात सुदैवाने या वाहनांतील कुणालाही गंभीर इजा झाली नाही. तर ट्रॅक्टरचे ब्रेक निकामी झाल्याची माहिती ट्रॅक्टर चालकाने पोलिसांना दिली. 
बातम्या आणखी आहेत...