आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उघड्यावर शौचास बसलेल्या इसमावर अचानक अस्वलाचा हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
file photo - Divya Marathi
file photo
बुलडाणा: गावाजवळ असलेल्या नाल्यात शौचास बसलेल्या एका इसमावर अचानक अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात सदर इसम किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना आज २५ मे रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास डोंगरखंडाळा येथे घडली. विशेष म्हणजे अस्वलाच्या हल्ल्याची ही चवथी घटना आहे. शहरापासुन काही अंतरावर असलेल्या डोंगरखंडाळा येथील सुभाष चव्हाण वय ४० हे आज पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास शौचासाठी गावाजवळ असलेल्या नाल्यात गेले. शौचास बसल्यानंतर त्यांच्या समोर मादी सह तीच्या दोन पिल्ले उभी ठाकली. यावेळी चव्हाण यांनी अस्वलाच्या तावडीतुन सुटण्याचा प्रयत्न केला असता मादी अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढविला. यावेळी जीव वाचविण्यासाठी त्यांनी प्रसंगवधान राखुन अस्वलाच्या नाकावर जोरदार ठोसा मारला. त्यामुळे अस्वल बेसावध झाले. त्याचा फायदा घेवुन चव्हाण यांनी तीन्ही अस्वलाच्या तावडीतुन आपली कशीबशी सुटका केली. तत्पुर्वी मादी अस्वलाने त्यांच्या मांडीला चावा घेतला होता. जखमी चव्हाण यांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. तसेच त्यांना उपचारासाठी वनविभागाकडून तातडीची मदत सुध्दा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन तीन महिन्यातील अस्वल हल्ल्याची ही चौथी घटना आहे. त्यामुळे गाव परिसरात अस्वलाचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे वनविभागाने सदर अस्वलाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
 
बातम्या आणखी आहेत...