आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोल्यात जाळल्या लाखो रुपयांच्या 500/1000 च्या जुन्या नोटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - चलनातून बाद झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नाेटा जाळण्याचा प्रयत्न करण्यात अाल्याची घटना शनिवारी दुपारी अकोला शहरातील विजय हाउसिंग सोसायटीमध्ये उघडकीस अाली. ही रक्कम नेमकी किती हाेती, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी लाखाे रुपयांच्या नाेटांची विल्हेवाट लावण्यात अाल्याचे समजते.
शनिवारी दुपारी काही महिला विजय हाउसिंग साेसायटीमध्ये कचरा वेचत हाेत्या. त्यांना तीन वेगवेगळ्या ठिकाणी चलनातून बाद झालेल्या पाचशे अाणि हजार रुपयांच्या नाेटा अर्धवट जाळण्यात अाल्याचे दिसून अाले. त्यांनी ही बाब परिसरात राहणाऱ्या युवकांना सांगितली. युवकांनी खदान पाेलिसांना माहिती दिली. पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या ठिकाणी कचराकुंडीत पाचशे अाणि हजार रुपयांच्या नाेटा अर्धवट जळालेल्या अवस्थेत अाढळून अाल्या. दरम्यान, केंद्र सरकारने घेतलेल्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर राज्यभरात ठिकठिकाणी नोटा सापडण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. शुक्रवारीच नागपूर आणि पुण्यात जवळपास दोन कोटींच्या पाचशे आणि हजारच्या नोटा आढळून आल्या होत्या.
नोटा पळवल्या
चलनातून बाद झालेल्या पाचशे अाणि हजार रुपयांच्या नोटा अाढळून अाल्याच्या ठिकाणी सर्वप्रथम काही महिला व पुरुष पाेहाेचले. ही माहिती इतरांना समजण्यापूर्वीच काहींनी न जळालेल्या नाेटा लंपास केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे पाेलिस अाता या नाेटा लंपास झाल्या का, याचाही शाेध घेणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...