आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराफा व्यावसायिकांनी पुन्हा उपसले ‘बंद’चे हत्यार, तीन दिवस दुकाने बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्याच्या दागिन्यांवर लावण्यात आलेल्या एक टक्का उत्पादन शुल्काच्या विरोधात तसेच उत्पादन शुल्काच्या जाचक अटी सराफा व्यावसायिकांवर लादण्यात येऊ नये, यासह इतर मागण्यांसाठी सुवर्णकार सराफा असोसिएशनच्या वतीने ३५ दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला होता. दरम्यान, केंद्र शासनाच्या आश्वासनावरून हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. परंतु अद्यापही त्या आश्वासनाची पूर्तता केल्याने सराफा व्यावसायिकांनी २५ एप्रिलपासून पुन्हा बंदचे हत्यार उपसले आहे. हा बंद तीन दिवस राहणार आहे. या बंदमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प होणार आहे. ऐन लग्नसराईत बंद पुकारण्यात आल्यामुळे याचा फटका सर्व सामान्य ग्राहकासह वधुवर पित्यांना बसत आहे.

जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, खामगाव, मलकापूर, देऊळगावराजा, मेहकर यासह इतर शहरात चारशेहून अधिक सराफाची दुकाने आहेत. मागील काही दिवसांपासून धुमधडाक्यात लग्नसराईला सुरूवात झाली आहे. त्यामुळे अनेक वरवधू पालक सोने, चांदीचे दागीने खरेदी करण्यासाठी सराफा व्यावसायिकाकडे जात आहेत. परंतु विविध मागण्यांसाठी सुवर्णकार सराफा असोसिएशनच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह वधूवर पित्यांना बसत आहे. सराफा व्यावसायिकांनी आजपासून पुन्हा बंदची हाक दिली आहे. हा बंद तीन दिवस चालणार आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील चारशे ते साडेचारशे सराफा व्यावसायिक सहभागी झाले आहेत. या बंदमुळे पुन्हा सराफा लाइनमध्ये शुकशुकाट पसरला असून, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. या बंदचा सर्वाधिक फटका वरवधू पित्यांना बसत आहे.

बंदला अनेक राजकीय पक्षाचा पाठिंबा
मागण्यांसाठीसराफा सुवर्णकार असोसिएशनने पुकारलेल्या बंदला राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. हा बंद तीन दिवस राहणार आहे. केंद्राचे अधिवेशन सुरू हाेणार आहे. त्यात सराफा व्यावसायिकांच्या मागण्यांसंदर्भात तोडगा निघण्याची शक्यता आहे. अनिल वर्मा, शहराध्यक्ष,सराफा असोसिएशन.