आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेबसाइटवर सात/बारा दिसेना अन् तो तलाठी कागदावर देईना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - लोकाभिमुख वेगवान प्रशासन व्हावे, यासाठी शासनाने जमिनीचा फेरफार, सात/बारा अन्य दस्तऐवज एका क्लिकवर देण्याचा मानस व्यक्त केला होता. मात्र, सर्व्हरमध्ये सातत्याने होणाऱ्या बिघाडामुळे शेतकऱ्यांचे काम सोपी होण्याऐवजी आणखीनच कठीण होऊन बसले आहे.
आपल्या विविध कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना सात/बारा, फेरफार नमुना ची आवश्यकता भासते. शासनाने ही गरज लक्षात घेता घरबसल्या नोंदी मिळाव्यात, यासाठी ऑनलाइन पद्धत सुरू केली. बनावट खरेदी, जमीन विक्रीवर आळा बसावा, हासुद्धा यामागील महत्त्वाचा उद्देश होता. शेतकऱ्यांसाठी आॅनलाइन ई-फेरफार सात/बारा मिळण्याची सुविधा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू झाली असली, तरी प्रत्यक्षात सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे चुकीचा सात/बारा, नमुना बाहेर निघत आहेत. शिवाय नेटवर्क कनेक्टिव्हिटीचीही अडचण होत असल्याने महसूल यंत्रणा फेल ठरली आहे. गत २० ते २५ दिवसांपासून जिल्ह्यात या सर्व्हरमध्ये मोठा बिघाड झाल्याने ऑनलाइन सात/बारा मिळणे कठीण होऊन बसले आहे. ऑनलाइन सात/बारा देणारे भूलेख सर्व्हर बंद पडले असून, नेटवर्क कनेक्टिव्हिटीची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांना कागदपत्रे मिळण्यासाठी विलंब होत आहे.

तलाठ्यांनी माहिती तर चुकीची भरली नसावी? : जिल्ह्यातीलसर्व तलाठ्यांनी गत वर्षभरात जमिनीचा डाटा महाभूलेख या सर्व्हरवर जोडण्याचे काम पूर्ण केले. महाभूलेख सात/बारा फेरफार आॅनलाइन मिळण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केले. मात्र, सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे तलाठ्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेल्याची वास्तविकता आहे. जमा बंदी आयुक्त कार्यालय, पुणेमार्फत वेबसाइट दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे समजते.

तलाठी हतबल : सात/बारा,फेरफार नोंदी अपडेशन करण्यात तलाठ्यांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. नुकतेच वेबसाइट अपडेट करण्यासाठी सर्व्हरमुळे होणारा त्रास दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले होते.

एकाच्यासात/बारामध्ये दुसऱ्याचे नाव : एखाद्याविशिष्ट व्यक्तीचा ऑनलाइन सात/बारा काढण्याचा प्रयत्न केला, तर त्यावर संबंधित व्यक्तीचे नाव तर येते. मात्र, त्यावरील माहिती ही तिसऱ्याच व्यक्तीची दिसून येत असल्याचे प्रकार नित्याचे झाले आहे. या प्रकाराने तलाठी वर्गाला मानसिक त्रास होत आहे.

^शासनाने सुविधादिली. पण त्याचा लाभ मात्र मिळू शकत नाही. वेबसाइटवर दुरुस्ती केल्यापेक्षा पूर्ववत ऑफलाइन म्हणजे कागदावरच सात/बारा मिळावा असे वाटते. यामुळे कामे लवकर होऊ शकतील. '' सुशील पाटील, रामदासपेठ

^बँकेचे कर्जघ्यायचे होते म्हणून सात/बारा काढण्यासाठी गेलो. मात्र, सेतू केंद्र संचालकाने सात/बारा निघत नसल्याचे सांगितले. सात/बारा मिळण्यासाठी विलंब होत आहे.'' श्रीकृष्ण ठोंबरे, शेतकरी,कान्हेरी

^काही दिवसांपासूनसात/बारा, फेरफारच्या नोंदी ऑनलाइन मिळण्यास विलंब होत आहे. मात्र, ती तांत्रिक बिघाड आहे. वेबसाइटचे अपडेशन सुरू असून लवकरच याचे निवारण होईल.'' राजेश्वर हांडे, तहसीलदार,अकोला

सर्व्हरच्या अडचणीबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ही अडचण राज्यात सर्वत्रच असल्याचे सांगण्यात आले. जर राज्यात ही अडचण असेल, तर ऑनलाइन प्रक्रिया राबवणारी यंत्रणा काय करतेय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.