अकाेला - जिल्हापरिषद प्रशासनाचा गलथान कारभार थांबण्याचे नाव घेत नसून एकाच व्यक्तिंची अनेक नावे शेळीगट दुधाळ जानवरांच्या यादीत असल्याचा प्रकार उजेडात अाला अाहे. याबाबत जि.प.सदस्य विलास इंगळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली अाहे.
अंतर्गत राजकारण अाणि प्रशासनावर सत्ताधाऱ्यांची पकड नसल्याने जिल्हा परिषदेच्या काेट्यवधी रुपयांच्या याेजना रखडल्या अाहेत. जिल्हा परिषेदेचाच निधी अखर्चित राहत असल्याचा मुद्या जानेवारी राेजी झालेल्या जिल्हा नियाेजन समितीच्या सभेतही उपस्थित झाला हाेता. समाज कल्याण विभागाचा यंदा काेटी ४८ लाख ( २० टक्के सेस फंड), दलित वस्ती विकास अंतर्गत २५ काेटी निधी पडून अाहे. तसेच गत वर्षी तर काेटी ७२ लाख रुपयांची (काेंबड्या वितरण ) याेजना राबवण्यातच अाली नाही. तसेच सन २०१४-१५मध्ये तर २७ लाख रुपये पडून हाेते. महिला बाल कल्याण विभागाचे सन २०१५-१६चे काेटी २३ लाख १६ हजार अािण सन २०१६-१७चे काेटी ८४ लाख १४ हजार रुपये पडून अाहे. तसेच जुलै महिन्यात तर बांधकाम विभागाच्या अखर्चित राहलेल्या काेटीचे निधीचे नियाेजन दाेन महिन्यापूर्वी करण्यात अाले हाेते.
दरम्यान, अाता पशुसंवर्धन विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या याेजनांमधील घाेळ उजेडात अाला अाहे. सन २०१६मध्ये विशेष घटक याेजनेअंतर्गत शेळीवाटप गट, दुधाळ जनावर वाटपाची याेजना राबवण्यात अाली. मात्र अाता जि.प. विलास इंगळे यांनी केलेल्या तक्रारीच्यानिमित्ताने अाता नवीनच घाेळ उजेडात येण्याची शक्यता वर्तवली जात अाहे.
काय अाहे तक्रारीत?: भाजपचे जि .प.सदस्य विलास इंगळे यांनी सन २०१३-१४ ते २०१६-१७ या वर्षात राबवण्यात अालेल्या याेजनांची मािहती पशुसंवर्धन विभागाकडे मागितली. मात्र त्यांना केवळ २०१६-१७मध्ये राबवण्यात येत असलेल्या याेजनेची मािहती देण्यात अाली. मात्र याएकाच व्यक्तिची नावे शेळीवाटप गट अािण दुधाळ जनावरांचे वितरण करण्यात येत असल्याचे यादीवर नजर टाकल्यास दिसून येत असल्याचे इंगळे यांनी तक्रारीत नमूद केले अाहे. लाभार्थींची निवड ही रॅन्डमपद्धतीने करण्यात अाल्याने यामध्ये घाेळ झाला अाहे. यासंपूर्ण प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला असून, याबाबत प्रशासकीय कार्यवाहीची मागणी त्यांनी केली अाहे.
अशी अाहे याेजना
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने शेळीगट दुधाळ जनावरांच्या वाटपासाठी एकूण साडे तीन काेटी रुपयांचे नियाेजन केले अाहे. दुधाळ जनावर वाटपासाठी ४१७ लाभार्थींची निवड करण्यात येणार असून, त्यासाठी दीड काेटी रूपये खर्च करण्यात येणार अाहे. दुधाळ जनावर वाटपासाठी ३१३ लाभार्थींची निवड करण्यात येणार असून, त्यासाठी दाेन काेटी रुपये खर्च हाेणार अाहे. या यादीला उपायुक्त कार्यलयाकडून मंजुरी देण्यात येणार अाहे.