आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाण्याची अनाथ शलाका बनली इटलीची कन्या, इटलीच्या दाम्पत्याने घेतले दत्तक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- अवघ्या एक दिवसाची असताना आई वडिलांनी मुलगी म्हणून नाकारून रस्त्यावर टाकून दिले. त्यानंतर सहा वर्ष ममता शिशु गृहात व्यवस्थितरित्या पालनपोषण झाले. परंतु अखेर तिच्या जीवनात आशेचा किरण सापडला असून अनाथ शलाकाला आज ६ एप्रिल रोजी इटलीच्या एका कुटुंबाने दत्तक घेवून माता पित्याचे प्रेम दिले. तर शलाकाच्या रुपाने त्यांना कन्यारत्न मिळाले आहे. 

इटली देशातील व्हेनेस शहरापासून शंभर किलोमिटर अंतरावर बेलबुनो हे छोटेसे गाव आहे. या गावातील मौर्या दालफ्रु इनरुको पेटारेलो हे कुटूंब वास्तव्यास असून त्यांचा व्यवसाय कॉफी मशिन विक्रीचा आहे. शारिरिक दोषामुळे त्यांना मुलबाळ झाले नाही. त्यामुळे त्यांनी प्रथम पुणे येथील एका अनाथलयातून स्नेहाला दत्तक घेतले होते. त्यावेळी स्नेहाचे वय अवघे अडीच वर्षे होते. 

सध्या स्नेहा ही सहाव्या वर्गात शिक्षण घेत असून तीच वय दहा वर्षे आहे. दरम्यान स्नेहाला बहिण अापल्याला दुसरी मुलगी मिळावी, यासाठी त्यांनी तेविस वर्षापासून सामािजक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ममता शिशु गृहातून सहा वर्षीय शलाकाला दत्तक घेतले. कायदेशिर सोपस्कार आटोपून आज इटलीमधील नवीन आई वडीलाच्या स्वाधिन करण्यात आले आहे. 

विशेष म्हणजे बुलडाण्यातील इटलीला जाणारी अनाथ बालिका शलाका ही पहिलीच आहे. एक वर्षाची असताना शलाकाला तिच्या आईवडिलाने रस्त्यावर सोडून दिले होते. सहा वर्षे ममता शिशु गृहात तिचे पालनपोषण झाले. अखेर उशिरा का होईना तिला आशेचा किरण सापडला. तर शलाकाच्या रुपाने इटली येथील कुटूंबांना दुसरे कन्या रत्न प्राप्त झाले आहे. यावेळी मुंबईचे ब्रायन डिसिल्वा, संस्थेचे अधिक्षक दिपक मनवर, हिम्मत पोहरे, देवानंद मोरे, शेख हनिफ, संतोष जाधव विजय राऊत यांची उपस्थिती होती. 

हक्काचे घर, आनंद देण्याचा प्रयत्न 
पिपल्स एज्युकेशन सोसायटीव्दारा संचालीत ममता शिशु गृह चालविण्यात येत आहे. या संस्थेत शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील अनाथ निराधार मुलांना प्रवेश देण्यात येत आहे. आजपर्यंत संस्थेने १११ मुलांना दत्तक देवून त्यांच्या जीवनात आनंद फुलविला आहे. त्यामुळे अनाथ बालकांना हक्काचे घर पालकाच्या जीवनात पितृत्वाचा आनंद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न संस्था करीत आहे. 
- अॅड.सुमित सरदार, संस्था संचालक 
बातम्या आणखी आहेत...