आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुविध उपचाराने कुष्ठरोगावर निश्चित मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - कुष्ठरोग इतर आजारांसारखाच रोगजंतूमुळे होणारा आजार आहे. कुष्ठरोग बहुविध उपचाराने निश्चित बरा होतो, असे सांगून कुष्ठरोगाच्या जनजागृती मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. भावना हाडोळे यांनी केले. २६ जानेवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अनुषंगाने डॉ. हाडोळे यांनी ३० जानेवारी रोजी जागतिक कुष्ठरोग दिनानिमित्त त्यांनी कुष्ठरोगाविषयी माहिती दिली. कुष्ठरोग ही अनादी काळापासून चालत आलेली मानवी समस्या असून, या रोगाचे रोगजंतू मानवी मज्जातंतूमध्ये वाढत असल्याने रुग्णास येणारी विद्रूपता व्यंगामुळे कुष्ठरोग लांच्छन असल्याचा समाजातील कित्येकांचा समज होता आणि अजूनही आहे. परंंतु, बहुविध औषधोपचार घेतल्याने कुष्ठरोग बरा होतो. कुष्ठरोग कुणालाही होऊ शकतो. कुष्ठरोग अानुवंशिक नाही, पाप-पुण्याचा कोणताही संबंध नाही. कुष्ठरोगाच्या जंतूंचा प्रजनन कालावधी हा १५ ते २० दिवस असा दीर्घ असतो. म्हणून अधिशयन काळसुद्धा ते वर्षे एवढा दीर्घ असतो. कुष्ठरोग सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांना होऊ शकतो. कुष्ठरोगाचे जंतू मुख्यत्वे चेतातंतू त्वचा यावर आघात करतात. त्यामुळेच कुष्ठरोगाची लक्षणे चेतातंतू त्वचेवर दिसतात. कुष्ठरोगाची शारीरिक लक्षणे चिन्हे यावरून रुग्णांची सांसर्गिकता ठरवता किंवा ओळखता येत नाही. केवळ जंतू परीक्षणानेच रुग्णांची सांसर्गिकता कळू शकते. कुष्ठरोग अानुवंशिक नाही. त्याचा संसर्ग फार कमी आहे. बहुविध औषधोपचार पद्धतीच्या एका मात्रेने लागटपणा म्हणजेच संसर्ग नाहीसा होतो. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालयांत कुष्ठरोगाची मोफत तपासणी औषधोपचार उपलब्ध आहे, असे डॉ. भावना हाडोळे यांनी सांगितले.
हे करा
1.नियमितपूर्ण औषधोपचार घ्या
2.कुठलीहीशंका असल्यास डॉक्टरांकडून खात्री करा
3.कुष्ठरोगींनाआपल्यापासून दूर करू नका
4.कुष्ठराेगीिदसल्यास तत्काळ आरोग्य यंत्रणेला माहिती द्या