आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य संचालकाकडून निलंबन प्रस्तावास खो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - हिवताप विभागातील १९ कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या केल्याप्रकरणी हिवताप विभागाचे सहायक संचालक डॉ. एम. एम. राठोड आणि जिल्हा हिवताप अधिकारी एस. पी. केसरी यांच्यावर पुणे येथील हिवताप विभागाच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी कारवाईचा प्रस्ताव आठ ते नऊ महिन्यांपूर्वी सादर केला असतानाही आरोग्य संचालकाकडून कारवाईस टोलवाटोलवी केली जात अाहे.

डॉ. राठोड यांनी हिवताप कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या या साेयीखातर आणि विनंतीअन्वये केल्याचे दिसून आले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे क्षेत्रीय कार्य हे ग्रामीण भागात असतानाही अशा कर्मचाऱ्यांना शहरात प्रतिनियुक्त्या दिल्या आहेत. या कर्मचाऱ्यांच्या परस्पर सेवा मूळ तांत्रिक कारणासाठी नव्हे, तर कार्यालयीन कामकाजासाठी करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. डॉ. राठोड यांच्या सांगण्यावरून एस. पी. केसरी यांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये अकोला जिल्ह्यातील दहा कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या केल्या होत्या. यवतमाळ आणि इतर ठिकाणच्या जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनीही काही कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्त्या दिल्या होत्या. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अकोला परिमंडळाचे उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांनी चौकशी समिती नेमली. या चौकशी समितीने दिलेल्या अहवालात डॉ. राठोड यांच्यासोबत डॉ. केसरी यांच्यावरही ठपका ठेवला होता. हा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी पुणे येथील हिवताप विभागाच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांच्याकडे पाठवण्यात आला. डॉ. कांचन जगताप यांनी चौकशी समितीचा अहवाल मान्य करत केसरी यांच्यावर अारोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांना शिफारसपत्र सादर केले. याला सहा महिने उलटून गेले, तरी आरोग्य संचालक पवार यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.
संचालकाकडूनचदडपले जात आहे प्रकरण : केसरीयांच्यावर प्रशासकीय कार्यवाही, तर डॉ. राठोड यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली आहे. असे असतानाही या प्रस्तावाला एक वर्ष उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई दोन्ही अधिकाऱ्यांवर झालेली नाही. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

अहवाल वरिष्ठांना सादर
चौकशीचा अहवाल आम्ही वरिष्ठांना सादर केलेला आहे. कारवाईचे अधिकार आम्हाला नाहीत. वरिष्ठांकडून अद्याप याप्रकरणी काही कळवण्यात आले नाही.'' डॉ. अविनाश लव्हाळे, उपसंचालक आरोग्य
बातम्या आणखी आहेत...