आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२०२ ग्रामपंचायतींचा कारभार पाहणार १६४७ सदस्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यातील २०२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात अाला. विजयी झालेल्या १६४७ उमेदवारांच्या नावांची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांनी केली. दरम्यान, मतमोजणी केंद्राबाहेर भरपावसात गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला दिसून आला.
ऑगस्ट ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २२० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तर ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी मंगळवार, ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात आले. एकूण ४०४४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी मतदारराजाला २०२ ग्रामपंचायतींमधून १६४७ सदस्यांना निवडून द्यायचे होते.
२०२ पैकी १५ ग्रामपंचायतींचे सदस्य अविरोध झाल्याने या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्याचे काम पडले नाही, तर दोन ठिकाणच्या निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमुळे रद्द करण्यात आल्यात. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या २५ ग्रामपंचायतींच्या ४१ सदस्यपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नाही. त्यामुळे त्या ठिकाणची निवडणूक स्थगित करण्यात आली. पुढील कालावधीत ही निवडणूक घेण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी १० ते दुपारी वाजेपर्यंत सर्व तालुक्यांच्या तहसील कार्यालयांच्या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी मतमोजणी केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. भरपावसातही विजेत्या उमेदवारांचा उत्साह दिसून येत होता. गुलाल फटाक्यांच्या आतषबाजीने विजयी उमेदवारांचे स्वागत कार्यकर्त्यांनी केले.
गावागावांत जल्लोष
ग्रामपंचायतनिवडणुकीचा निकाल ऐकल्यानंतर विजेत्या पॅनलने गावात जल्लोष केला. गावकऱ्यांनी उमेदवारांचे स्वागत केले. गावागावांत ढोलताशे फटाक्यांनी शिवार दणाणून गेला होता. अाता सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु झाली अाहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, जल्‍लोषाचे फोटो आणि इतर माहिती..