आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदस्यांना ‘सांभाळण्या’ची जबाबदारी तालुकाध्यक्षांकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती-उपसभापती पदासाठीची निवड प्रक्रिया मंगळवारी सकाळी ११ वाजता पार पडणार अाहे. या निवडीच्या पृ्ष्ठभूमीवर सदस्यांना ‘सांभाळण्या’ची जबाबदारी पक्षांनी तालुकाध्यक्ष इतर पदािधकाऱ्यांवर दिली अाहे.
पंचायत समिती सभापती पदाचे अारक्षण २३ जून राेजी जाहीर केले हाेते. अकाेला-एसी, अकाेट-सर्वसाधारण, तेल्हारा -सर्वसाधारण महिला, पातूर -एससी (महिला), बार्शीटाकळी-एसटी (महिला), मूिर्तजापूर-नागरिकांचा मागास प्रवर्ग, बाळापूर-ना.मा.प्रसाठी (महिला) राखीव असल्याचे जाहीर केले. बािर्शटाकळी,अाकाेट, तेल्हारा, बाळापूर पातूर या पाच पंचायत समिती सभापतीपती सध्या भािरप-बमसंचे अाहेत. अकाेला मूिर्तजापूरच्या पंचायत समितीमध्ये शिवसेना-भाजपची सत्ता अाहे.

अकाेल्या तिशवसेना, मूिर्तजापूरमध्ये भाजप ? : अकाेलामूिर्तजापूर पंचायत समिती सभापतीपदासाठी शिवसेना-भाजपमध्ये जवळपास समेट घडल्याची मािहती सूत्रांकडून प्राप्त झाली अाहे. अकाेल्यात शिवसेनेच्या सभापतीपदाच्या उमेदवाराला भाजप मूिर्तजापूरमध्ये भाजपच्या उमेदवाराला शिवसेना पाठिंबा देणार असल्याचे समजते. अर्थात राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काय हाेईल, हे सांगता येणार नसल्याने मंगळवारी चित्र स्पष्ट हाेणार अाहे. सभापतीपदावर भाजपमधील एका गटाने दावा केला. शिवसेनाही हे पद साेडण्यास तयार नाही. साेमवारी दाेन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांशी चर्चा केली. दाेन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये पदासाठीचा ितढा सुटल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. मंगळवारी सकाळीही नेत्यांमध्ये चर्चा हाेणार अाहे.
..तर समीकरण बदलणार
पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेत शिवसेना-भाजपने घटस्फाेट घेतल्यास भविष्यात राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत अाहेत. दाेन्ही पक्ष अापअापल्या मागणीवर ठाम राहिल्यास याचा परिणाम ३० जून राेजी हाेणाऱ्या िजल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या िनवड प्रक्रियेवर हाेण्याची शक्यता अाहे.
बातम्या आणखी आहेत...