आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किडनी पीडितांच्या मुलांना पंकजाताईंनी दिला आधार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - उदरनिर्वाह चालवण्यासाठी स्वत:ची किडनी विकलेल्या कुटुंबातील मुलांना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षणासाठी दत्तक घेतले. या कुटुंबासाठी एक लाख रुपयांचा धनादेश शनिवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बीड येथे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंंच्या स्मारक लोकार्पणप्रसंगी दिला.

हरिहरपेठेतील अमर सिरसाट यांच्या घरी अठराविश्वे दारिद्र्य असल्यामुळे त्यांना काही दलालांनी किडनी विकण्याचा सल्ला दिला. या वेळी बुलडाणा जिल्ह्यातील विनोद पवार याच्या मदतीने त्याला पैशाचे आमिष देऊन त्याची एक किडनी विकली.त्या मोबदल्यात त्यास अत्यल्प मोबदला देऊन त्यांची फसवणूक केली. किडनी तर विकली आता आपण जास्त दिवस जगणार पण नाही, किडनीच्या मोबदल्यात पैसेही मिळाले नाही, म्हणून त्याला नैराश्य अाले. याही परिस्थितीत अमरची पत्नी रेखा मोलमजुरी करून मुलगी विजया वय वर्षे, मुलगा अभेद्य वय वर्षे यांचे पालनपोषण करत आहेत. या घटनेची माहिती ग्रामविकास, बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना मिळताच त्यांनी या कुटुंबाचा भार उचलण्याची घोषणा केली. बीड येथे शनिवारी गोपीनाथ गड कार्यक्रमासाठी उपस्थित भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत अमर सिरसाट यांचा मुलगा अभेद्य याला मुंडे प्रतिष्ठानतर्फे अभेद्य विजया यांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयांचे फिक्स डिपॉझिट करून पावती देण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...