आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागड्या शिक्षण व्यवस्थेमुळे पालक आर्थिक अडचणीत, शिकवणी वर्गाची फी एक वर्षासाठी दीड लाखावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - दहावीच्या निकालाला दोन महिने अवकाश असला तरी महागड्या शिकवणी वर्गाचा प्रचार सुरू झाला आहे. विविध प्रलोभने शिक्षण पद्धतीचा बागुलबुवा दाखविल्याने पालक पाल्याच्या शिक्षणासाठी धावाधाव करताना दिसत आहेत. त्यातच अकरावी, बारावीच्या शिकवण्या घेणाऱ्या वर्गाची एका वर्षाची फी एक लाख ६० हजार रुपये झाली आहे. अशा शिक्षणाकडे शासनाचे पारदर्शी लक्ष नसल्याने पालकांमध्ये नाराजी आहे.
 
बुलडाणा जिल्ह्यात कधीकाळी शिकवणीसाठी लातुर पॅटर्नची लागण लागली होती. त्यामुळे पालक लातुर येथे पाल्यांना शिक्षणाकरता पाठवित होते. अनेक बुलडाण्यातील विद्यार्थी लातुरला जाऊन त्या भागात गुणवत्ता यादीत आल्याचे दिसत होते. मुळातच क्रीम असलेल्या या विद्यार्थ्यांच्या भरवशावर लातुर पॅटर्न श्रीमतांनी मोठे केले. आजही लातुर येथील नीट, जेईई, आयआयटीचे प्रलोभन कायम आहे.
 
परंतु, बुलडाणेकरांचा कल सध्या कोटा येथील शिक्षण पद्धतीकडे वळला अन् पुन्हा श्रीमतांच्या मुलांचा शिक्षणाचा कोटा कोट्यात जाऊन वाढला आहे. अधिकारी कर्मचारीही मुलांना कोटा येथे पाठवून मोठा करण्याचे चकरात पडले आहे. आता लातुर असो वा कोटा पॅटर्न बुलडाणा जिल्ह्यात सुरू झाल्यास नवल नाही. काही शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनीही असे शिक्षण शाळेत कसे मिळणार याची जंत्रीच उघडली आहे. जिल्ह्यात कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या शे दीडशेच्या आसपास आहे. बुलडाणा शहर लगत दहापेक्षा अधिक कनिष्ठ महाविद्यालय आहेत. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शिकवणी वर्ग प्रवेशाची लगबगही सुरू झाली आहे.
 
प्रश्न कॉलेजचा नव्हे तर प्रवेशाचाही: उन्हाळयाला सुरुवात झाली असून, प्राथमिक शाळेच्या परीक्षाही सुरू आहेत. तर विद्यार्थी मिळविण्याची कसरत आता खासगी कॉन्व्हंेट शाळांच्या मास्तरांना करावी लागत आहे. येत्या दोन महिन्यात विद्यार्थी मिळविण्यासाठी भटकंती सुरू होणार असली तरी शाळेचे शुल्क आता झेपावण्यासारखे राहिलेले नाही. शाळा प्रवेशालाच पालकांना शुल्क भरण्यासाठी घरझडती घ्यावी लागत आहे. २५ टक्के सवलत तर अद्यापही दिसत नाही.
 
कॉलेजऐवजी शिकवणी वर्गात गर्दी : सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिकवणी वर्गांचे महत्व अवास्तव वाढले आहे. दहावी, बारावीची परीक्षा संपत नाही तोच पालक आपल्या पाल्यांना शिकवणी वर्गात ढकलत आहेत. सध्या या शिकवणी वर्गाची फी लाखोच्या घरामध्ये पोहोचली आहे. गरीब पालक आपल्या मुलांना या वर्गामध्ये प्रवेश देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. एकीकडे शासन विविध विषयावरील महाविद्यालये उघडून त्यातील प्राध्यापकांना लाखो रुपये पगार म्हणून वाटत असताना या महाविद्यालयाच्या वर्गांना विद्यार्थीच जात नसल्याचे वास्तव समोर आले आहे. दुसरीकडे शिकवणी वर्गामध्ये मात्र विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. शासनाने सर्वांनाच शिक्षण मिळावे याकरीता ते सहज सुलभ केले असता शिकवणी वर्गाने ते महागडे करून टाकले आहे.
 
सोशल मिडीयावर उडविले जाते टर
सध्या प्राथमिक शिक्षणात पालकांना कसे लुबाडले जात आहे. याची टर सोशल मिडियावर आता सुरू झाली आहे. अनेक जण त्यातून सावध होत असताना शिकवणी चालक शिक्षण संस्था मात्र निर्ढावलेलेच आहेत. त्यांच्यावर कोणताच परिणाम दिसत नाही.
 
शिकवणी वर्गाचे शुल्क भरताना होत आहे दमशाक
दहावी नंतर काय? हा प्रश्न सोडविण्यासाठीच्या मार्गदर्शनापासून शुल्क मोजावे लागत आहे. तर अकरावी बारावीचे अॅडमिशन कोणत्याही कॉलेजला घ्या, परंतु, शिकवणी वर्ग आपल्याकडे लावण्यासाठी धावपळ सुरू झाली अाहे. अनेक शिकवणी वर्ग तर प्रवेश शुल्क वेगळे शिकवणी शुल्क वेगळे असे करुन प्रवेशाचे हजार रुपये शिकवणीचे दहा ते तीस हजार तात्काळ भरण्यास सांगतात. हा शिकवणीचा व्यवसाय नजीकच्या जिल्ह्यात सुरू असून, बुलडाण्यातही त्याचा वास दरवळत आहे. या मध्ये पालकांची चांगलीच दमछाक होत आहे.
 
बातम्या आणखी आहेत...