आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पासपोर्ट ऑनलाइन पडताळणीचे काम, प्रथमच बुलडाण्यात सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - महाराष्ट्रातुन सर्वप्रथम बुलडाणा जिल्हयात सर्व पोलिस स्टेशन अंतर्गत ऑनलाइन पासपोर्ट पडताळणीचे काम नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आले आहे. या प्रणालीमुळे पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया सुलभ होऊन घरपोच सुविधा मिळणार असून पाच ते दहा दिवसाच्या आत नागरिकांना पासपोर्ट मिळणार आहे.
 
नागपुर येथील पासपोर्ट कार्यालयात जाऊन अर्ज केल्यानंतर सदरचा अर्ज पारपत्र कार्यालय, बुलडाणा येथे प्राप्त होत होता. त्यानंतर टपालद्वारे संबधीत उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्फंत संबधीत पोलीस स्टेशनला पडताळणी करता पोलिस स्टेशनला हजर रहावे लागत होते. दरम्यान अर्जदार यांनी नागपूर येथे भरलेल्या पी.पी फॉर्म मधील माहितीची पडताळणी करणे अर्जदार यांचा जबाब नोंदविणे, साक्षीदार तपासणे, कागदपत्राची पडताळणी पूर्ण होण्याकरिता किमान १० ते १५ दिवसाचा कालावधी लागत असे. अर्जदार यांना स्वत: पोलिस स्टेशनला हजर व्हावे लागत असे तसेच सदरची टपालाने आण करण्याकरता सात ते आठ दिवसाचा कालावधी लागत होता. त्यामुळे अर्जदार यांना पारपत्र मिळण्यास उशीर लागत होता.
 
एम पासपोर्ट पोलिस अॅप प्रणालीद्वारे सर्व प्रक्रिया पेपरलेस झाली असून, संबधीत पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी हे अर्जदार यांचे घरी जाऊन पडताळणी करणार आहे. टपाल ने आण करण्याकरता सात ते आठ दिवसाचा कालावधी वाचणार असून, ऑनलाइन पद्धतीने सर्व माहिती एम पासपोर्ट पोलिस अॅपमध्ये भरुन पारपत्र काढण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन कमीत कमी दिवसात अर्जदार यांचे घरी पासपोर्ट येणार आहे. पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक शशीकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे,श्याम घुगे,सायबर सेलचे सपोनि मनोज केदारे, पारपत्र कार्यालयाचे पोलिस उपनिरीक्षक पी.एस.सिसोदे यांच्या सहकार्याने एम अॅप प्रणालीद्वारे ही सुविधा उपलब्ध झाली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...