आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेशन्ट म्हणून आले अन् रुग्ण सेवाकार्यात रमले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला; अपंगव्यक्तींना पुन्हा नव्याने पाय मिळाले, तर त्यांच्या आयुष्यात एक प्रकारे नवचैतन्य निर्माण करण्यासारखे आहे. कोलकाता येथील महावीर सेवा सदन येथे अशा अपंग व्यक्तींना कृत्रिम पाय तयार करून बसवून देण्यात येते. येथे कधी काळी रुग्ण म्हणून आलेले व्यक्ती याच सेवा कार्यात रमले असून, अाज ते इतरांना कृत्रिम पाय बसवण्याचे काम करत आहेत.
शहरातील सायब स्मृती भवनात श्रीराम सेवा समिती आणि महावीर सेवा सदन यांच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क कृत्रिम पाय प्रत्यारोपण शिबिर सुरू आहे. शिबिरासाठी कोलकाता येथील सात सदस्य आले असून, ते सकाळी पासून, तर रात्री वाजेपर्यंत निरंतर कार्य करत आहेत. सेवा सदन येथील पप्पू शाह, रामजी राय, प्रबीर पंडित, देवाशिष सरदार, सुरेंद्र राय, मुकेशकुमार पांडे, मंगलू कोयली हे सातही लोक या संस्थेत काही वर्षांपूर्वी रुग्ण म्हणून आले होते. काही २० वर्षे, काही १५, काही १२, तर काही अगदी अलीकडे म्हणजे वर्षांपूर्वी या कार्यात सहभागी झाले. इतरांचे दु:ख समजून घ्यायला कधी तरी त्या दु:खातून आपण गेलो असलो पाहिजे, असे म्हटले जाते. याच विचाराप्रमाणे या व्यक्तींचे आयुष्य आहे.

या लोकांना पाय नव्हते म्हणून ते शांत बसले नाहीत, तर त्यांनी स्वत: कृत्रिम पाय बसवून इतरांनाही त्याचा लाभ व्हावा, यासाठीच कृत्रिम पाय बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. एवढेच नाही, तर दिल्ली विद्यापीठातून त्यांनी यांतील पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला असून, सध्या काही जण पदवीचा अभ्यास करत आहेत. यात त्यांना विविध विषयांचे अध्ययन असून, त्यात प्राथमिक फिजिओथेरपीचाही समावेश आहे. पाय नसले म्हणून खचून जाता, त्यांनी कृत्रिम पाय तयार करण्याला व्यवसाय करून घेतला असून, यातून ते स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधत आहेत.

दीड तासात बनतो पाय
एकपाय पूर्ण तयार व्हायला एक ते दीड तास लागतो. प्रथम साचा तयार केला जातो. नंतर त्यात प्लॅस्टर ऑफ पॅरिस टाकून पायाचा आकार तयार केला जातो. स्कीन कलरच्या प्लास्टिक पाइपला ओव्हन मशीनमध्ये गरम करून या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या पायावर बसवले जाते. थोड्या वेळाने प्लास्टिक पाइप थंड झाल्यावर त्याला पायाचा योग्य आकार येतो. मग त्याला स्क्रूने जोडून, त्याला आवश्यक त्या आकाराचा पंजा लावला जातो. हा कृत्रिम पाय अडीच ते तीन वर्षे चांगला राहतो.
सायब स्मृती भवनात आयोजित शिबिरात कृत्रिम पाय तयार करण्यात येत आहेत.