Home »Maharashtra »Vidarva »Akola» Pension According To Sixth Pay Commission For Pensioners Of 2006-09

2006-09 च्या निवृत्ती धारकांना सहाव्या वेतन आयोगानुसार पेंशन, पेंशनधारकांना दिलासा

दिलीप ब्राम्हणे | Oct 12, 2017, 10:55 AM IST

  • 2006-09 च्या निवृत्ती धारकांना सहाव्या वेतन आयोगानुसार पेंशन, पेंशनधारकांना दिलासा
अकोला- जानेवारी २००६ ते २७ फेब्रुवारी २००९ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सहाव्या वेतन आयोगानुसार पेंशनचा अधिकार राज्य सरकारने नाकारला होता. त्यानंतर कर्मचारी न्यायालयात गेले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर औरंगाबाद खंडपीठाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला होता. मात्र राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची आव्हान याचिका खारीज केली. यामुळे आता पेंशनधारकांना सहाव्या वेतन आयोगानुसार पेंशन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यात जानेवारी २००६ पासून राज्यात सहावा वेतन आयोग लागू झाला होता. मात्र त्यानंतर २८ फेब्रुवारी २००९ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या वर्ग ते वर्ग पर्यंतच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगानुसारच निवृत्ती वेतनाचे लाभ मिळतील, असे धोरण सरकारने निश्चित केले. म्हणून काही कर्मचारी मॅटमध्ये गेले. तेथे कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल लागला. तरीही राज्य सरकारने टाळाटाळ केली. त्यावर अकोला येथील याचिकाकर्ते पी.टी. व्यास इतर सहा जणांनी नागपूर औरंगाबाद खंडपीठात स्वतंत्र याचिका दाखल केल्या. न्यायालयाने राज्य कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला शेवटच्या महिन्याचे वेतनाच्या ५० टक्के निवृत्ती वेतन मंजूर करण्याचे आदेश राज्यसरकारला दिले होते. मात्र २०१५ मध्ये राज्य सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. ही याचिका ११ ऑक्टोबर रोजी न्यायमुर्ती अरुण मिश्रा न्यायमुर्ती मोहन एम. शंतनगौड़ार यांच्या न्यायालयाने खारिज केली.

Next Article

Recommended