आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मोत्सव: जिजाऊ चरणी झाले नतमस्तक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंदखेडराजा - महाराष्ट्राची अस्मिता माँ साहेबांच्या जन्मदिनी सिंदखेडराजा येथे राजवाड्यावरील जिजाऊ जन्मस्थळी आज, १२ जानेवारी रोजी सूर्योदयी पहाटे वाजेपासून लाखो जिजाऊ भक्त दर्शन घेऊन नतमस्तक झाले. यामध्ये विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता. जिजाऊंच्या वेशातील मुली लक्ष वेधून घेत होत्या.

पहाटे वाजेपासूनच माँ साहेब जिजाऊंच्या जन्मस्थळी रांगोळी काढून फटाक्यांची प्रचंड अातषबाजी करत ढोलताशांच्या गजरात जिजाऊ जन्माचे स्वागत करण्यात आले. या वेळी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो जिजाऊ भक्त सिंदखेडराजात दाखल झाले होते. सकाळी सूर्योदय समयी सकाळी वाजता जिजाऊंची महापूजा करण्यात आली.

सिंदखेडराजा येथील शिवाजीराजे जाधव संगीताराजे जाधव यांनी सपत्नीक परंपरागत जिजाऊंचे पूजन करून अभिवादन केले त्यानंतर मिठाईचे वाटप करण्यात आले. यानंतर मराठा सेवा संघाच्या वतीने महापूजा करण्यात आली. यामध्ये सुनील शेळके तसेच जयश्रीताई शेळके, सुभाष कोल्हे, अर्चना कोल्हे, मोहनराव अरबट, वनिता अरबट, छायाताई महाले, दिलीपराव महाले, दुर्गा महाले रवी महाले, शीतल तनपुरे शिवाजीराव तनपुरे यांनी सपत्नीक महापूजा केली.
यानंतर नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा गंगाताई तायडे, दिलीप तायडे, उपनगराध्यक्षा सरस्वती मेहेत्रे, प्रकाश मेहेत्रे यांनी सपत्नीक पूजन केले. या वेळी तुकाराम खांडेभराड, दिलीप आढाव, जगन ठाकरे, प्रकाश मेहेत्रे, अातिश तायडे, शहाजी चौधरी, तुळशिदास चौधरी, योगेश म्हस्के उपस्थित होते. या वेळी जालनाचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनीही जिजाऊंना अभिवादन केले.

यानंतर जिल्हा परिषदेच्या वतीने भव्य शोभायात्रा काढून शासकीय पूजन करण्यात आले. यामध्ये सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, जिल्हा परिषद अध्यक्षा अलकाताई खंडारे चित्रांगण खंडारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, मुख्य कार्यपालन अधिकारी दिपा मुधोळ, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी वैशाली ढग, पंचायत समिती सभापती बेबीताई विठ्ठलराव राठोड उपसभापती, विठ्ठलराव इलग, महिला बालकल्याण सभापती आशाताई झोरे, दिनकरराव देशमुख, जि.प. सदस्य विनोद वाघ, नाथाभाऊ दराडे, गटविकास अधिकारी डॉ. नीलेश पाटील, दादाराव मुसदवाले उपस्थित होते.
शिव खिचडीचे वाटप
राष्ट्रमाताजिजाऊ माँ साहेबांच्या जन्मोत्सवासाठी दरवर्षी देशभरातून सिंदखेडराजा नगरीत जिजाऊ भक्त माँ साहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात. त्या भक्तांना स्थानिक उत्कर्ष फाउंडेशन सिद्धार्थ उत्पादक सह. संस्थेच्या वतीने राजवाड्यासमोर मोफत खिचडीचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम मागील पाच वर्षांपासून करत आहेत. उत्कर्ष फाउंडेशनचे मंत्रालयीन सचिव सिद्धार्थ खरात यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. संदीप मेहेत्रे, संजय मेहेत्रे, गजानन मेहेत्रे, शहाजी चौधरी, गंगाधर खरात यांनी सहकार्य केले.