आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच कंपन्यांना तूर खरेदीची परवानगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यात स्थापन झालेल्या १३ शेतकरी उत्पादक कंपन्यांपैकी शेतकरी उत्पादक कंपन्यांना महाराष्ट्र राज्य छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ (एसएएफसी) आणि महाराष्ट्र राज्य शेतकरी उत्पादक संघ (महाएफसी) यांच्या वतीने किमान आधारभूत किमतीवर आधारित तूर खरेदीच्या केंद्रांना नुकतीच परवानगी मिळाली आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्याकडील उत्पादित खरीप हंगामातील तूर जवळच्या शेतकरी उत्पादक कंपनीकडे किमान आधारभूत किमतीने विक्री करता येणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्याकडील मालाची आर्द्रता कमी करुन किंवा पूर्ण वाळलेला, स्वच्छ केलेला माल असावा असे आवाहन आत्माचे प्रभारी प्रकल्प संचालक अशोक बाणखेले यांनी केले आहे. 

शेतकऱ्यांनी बँकेच्या खात्याची प्रत, आधारकार्ड शेतकऱ्यांनी सोबत आणावे लागेल. सदरची खरेदी केंद्र उत्पादक कंपन्यांनी स्थापन केलेल्या शेतकरी सामुदायिक सुविधा केंद्राच्या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे. या केंद्रांमध्ये शेतकऱ्यांना किफायतशीर किमतीने शेतमाल, मशीनद्वारे सफाई प्रतवारी करुन देण्यात येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना परवानगी मिळाली आहे त्यात अकोट अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी अकोट, शिवार्पण अॅग्रो कंपनी, किसनराज अॅग्रो कंपनी, पूर्णामा शेतकरी उत्पादक कंपनी, आधुनिक किसान शेतकरी उत्पादक कंपनी कौलखेड जहांगिर यांचा समावेश आहे. यापैकी शिवार्पण आणि अकोट अॅग्रोने काम सुरू केले आहे. कंपन्यांना गोदामाची उपलब्धता, बारदाना आदी आनुषंगिक व्यवस्था आवश्यक असल्याचे जिल्हा कृषी पणन तज्ज्ञ नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...