आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा महिन्यांपासून पेट्रोलपंप बंद, वाहनधारकांना हेलपाटे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू- बोरगावमंजूनजीक असलेला सतगुरू हायवे सर्व्हिस पेट्रोलपंप हा गत सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे वाहनधारकांना दहा ते बारा किलोमीटरवरून पेट्रोल आणावे लागत आहे. यामुळे पळसो बढे, दहीगाव, अन्वी मिर्झापूर, वणी रंभापूर, पैलपाडा, निपाणा, कानशिवणी येथील वाहनधारकांना हेलपाटे घ्यावे लागत आहेत.

बोरगावमंजू तसेच आजूबाजूच्या नागरिकांच्या सोयीनुसार बोरगावला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हा पंप गत २० ते २५ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला होता. बोरगाव ग्रामपंचायतने २५० बाय २५० एवढी जागा पेट्रोलपंपासाठी उपलब्ध करून दिली होती. मात्र, गत सहा महिन्यांपासून हा पेट्रोलपंप बंद असल्यामुळे वाहनधारक तसेच शेतकऱ्यांना नाहकचा त्रास सहन करावा लागत आहे.
शेतकरीहीझालेत त्रस्त : अकोलातालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला असून, सर्व शेतकऱ्यांच्या हातून सोयाबीनचे पीक गेले आहे. सध्या शेतकरी तुरीच्या पिकाच्या आशेवर जगत आहे. त्यासाठी शेतकरी तुरीला पाणी देण्यासाठी डिझल इंजिनचा वापर करत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना डिझेलसाठी दहा ते बारा किलोमीटर जावे लागत आहे.
...तरदुसरा वितरक नेमावा : सध्यापेट्रोलपंपाच्या जागेत फक्त ट्रान्सपोर्टची वाहने उभी असतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देऊन पेट्रोलपंप सुरू करावा, अन्यथा दुसऱ्या वितरकाला पंप देऊन वाहनधारकांची होणारी गैरसोय थांबवावी, इंडियन आॅइल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबीची चौकशी करून पंप सुरू करण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी होत आहे.

हजारोवाहनांची ये-जा : मार्गावरूनदरराेज १० ते १२ हजार दुचाकी गाड्या, ते हजार चारचाकी गाड्या, २००० ते २५०० ट्रॅक्टरची ये-जा सुरू असते. हा पेट्रोलपंप हायवेला लागून असल्यामुळे वाहनांचीसुद्धा पेट्रोल डिझेल नसल्यामुळे गैरसोय होत आहे.

वरिष्ठअधिकाऱ्यांनी द्यावे लक्ष : बाेरगावमंजूचापेट्रोलपंप बंद असल्यामुळे खेड्यातील नागरिकांची तसेच शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. या बाबीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी वणीरंभापूरचे सरपंच नितीन भालतिलक यांनी केली आहे.

वाहनधारकांना सहन करावा लागतो मनस्ताप
^पेट्रोलआणण्यासाठीदहा ते बारा किलोमीटर जावे लागते. यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष पुरवावे.'' उमेश खोडे, सदस्य,ग्रामपंचायत, बोरगाव
गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे
^सतगुरूहायवेसर्व्हिस पेट्रोलपंप गत सहा महिन्यांपासून बंद आहे. नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता, संबंधित अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.'' सुनील सावळकर, तालुकासंघटक, विहिंप

परस्पर पैसे काढल्यामुळे पेट्रोलपंप ठेवलाय बंद
^माझ्याखात्यातूनएका जणाने परस्पर पैसे काढले. याबाबतची तक्रार बोरगावमंजू पोलिस ठाण्यात २४ जुलै रोजी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकारामुळे सतगुरू हायवे सर्व्हिस पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आला आहे.'' गोविंद चावला, संचालक,सतगुरू पेट्रोल पंप
पेट्रोलपंप बंद असल्यामुळे येथे ट्रान्सपोर्टची वाहने ठेवण्यात येत आहेत.