आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवणी-शिवापूर रेल्वेस्थानक रस्त्याची केली लोकसहभागातून दुरुस्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शिवणी-शिवापूररेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम शिवणी शिवापूर रेल्वे स्थानक कृती समितीने लोकसहभागातून रविवारी केले.
शिवणी-शिवापूर रेल्वे स्थानकाला उपरेल्वे स्थानकाचा दर्जा मिळावा यासाठी ‘दिव्य मराठी’ने पुढाकार घेतला आहे. तसेच शिवणी शिवापूर आणि आजूबाजूच्या गावांतील नागरिकांनी मिळून दिलीप भरणे यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी कृती समितीची स्थापना केली आहे. ही कृती समिती रेल्वे स्थानकाच्या विकासाबरोबरच येथे सर्व रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, मलकापूर पासून रेल्वे स्थानकवार ये-जा करण्यासाठी डांबरी रस्ता त्यावर पथदिवे असावे, यासाठी संघर्ष करत आहे. त्याला मलकापूर येथील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. रविवारी मलकापूर ते एमआयडीसी पर्यंतचा रेल्वे स्थानकाचा रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम केले. या वेळी कृती समितीचे अध्यक्ष दिलीप भरणे, उपाध्यक्ष श्रीकृष्ण इंगळे, सचिव आनंदराव गवळी, कोषाध्यक्ष पंजाबराव मोडक, प्रसिद्धी प्रमुख प्रमोद धर्माळे, दामोदर महानकर, दामोदर माळी, दिगंबर कावरे, परुषोत्तम पटोकार, तेजराव नरवाडे, सचिन इंगळे, पांडुरग राऊत, अजय सोळंके, बाळू पांडे, मनोज खंडारे, आशिष भिसे, मंगेश वानखडे, डी.बी. मांगुळकर, मंगेश सिरसाट,शरद वानखडे, प्रकाश दामोदर, अथर्व भरणे, अनिल भरणे, अनिल इंगोले, भारत गोपनारायण, निखिल गोपनारायण, अजय इंगळे, राहूल खंडारे, हसमुख ठेकेदार, सै. ख्याजा ठेकेदार, प्रल्हाद मानकर, मनोहर नारे, परसराम मानकर, अनिल इंगळे, पंकज मांगुळकर, गजानन ढोणे, उत्तम छबिले, पप्पु जाधव, गणेश पाटील, सेवानंद इंगळे, राजू काळे, दीपक भरणे, दामोदर केने, हेमंत चव्हाण, शेख बशीर आदी उपस्थित होते.

या रेल्वे स्थानकाला उपरेल्वे स्थानकाचा दर्जा देण्यासाठी मनपा प्रशासनाने प्रयत्न करावे. रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी मलकापूरमधून रस्ता केल्यास प्रवाशांसाठी सोयीचे होईल शहरातील वाहनांची वर्दळ कमी होईल, त्यासाठी महापालिका प्रशासनाने आता याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शिवणी-शिवापूर उपरेल्वेस्थानक कृती समितीने केली आहे.
बातम्या आणखी आहेत...