आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी सैनिकांच्या कल्याणाचे शासकीय यंत्रणेलाच वावडे!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - एेन उमेदीचा काळ भारतीय सैन्यात घालवणारे माजी सैनिक, त्यांच्या विधवा पत्नी त्यांच्या पाल्यांच्या विकासासाठी द्याव्या लागणाऱ्या ध्वजदिन निधीत खुद्द यंत्रणेनेच टाळाटाळ चालवल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी सैनिकांच्या कल्याणासाठी शासनातर्फे विविध योजना राबवल्या जातात. या योजनांना मदत म्हणून शासकीय निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी - कर्मचाऱ्यांकडून दरवर्षी मदत घेतली जाते. मात्र, या मदतीसाठीही टाळाटाळ सुरू आहे.
काही कार्यालयांनी हिरीरीने सहभाग नोंदवला, तर काहींनी अजून प्रारंभच केला नाही, अशी वास्तविकता आहे. राज्य उत्पादन शुल्क, दोन्ही शासकीय रुग्णालये, खनिकर्म विभाग या कार्यालयांनी हा निधी अद्याप जमा केला नसून जिल्हा परिषद, महापालिका जिल्हाधिकारी कार्यालयाने उद्दिष्टपूर्तीसाठी बऱ्यापैकी पुढाकार घेतल्याची माहिती आहे.

ध्वज दिन निधीच्या नावाखाली ही रक्कम गोळा केली जाते. त्यासाठी त्या-त्या कार्यालयांच्या प्रमुखांना विश्वासात घेऊन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या श्रेणीनुसार रकमा निश्चित केल्या जातात. परंतु, काही कार्यालये त्यातही टाळाटाळ करतात, असे निरीक्षण आहे. यावर्षी जिल्हा सैनिक कार्यालयाला ५८ लाख हजार रुपये गोळा करायचे आहेत. मात्र, आतापर्यंत केवळ ४६ लाख हजार ५५ रुपयेच जमा झाले.

जिल्हाधिकारी कार्यालय, एसडीओ तहसील कार्यालय, टपाल विभाग, जिल्हा परिषद, महापालिका, आरोग्य विभाग, पोलिस विभाग, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय आदी आस्थापनांना फार पूर्वीच त्या-त्या कार्यालयांचे उद्दिष्ट कळवले जाते. यावर्षीही ही प्रक्रिया ठरलेल्या वेळेत पूर्ण केली. मात्र, उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने अद्याप बहुतेकांनी पुढाकार घेतला नाही, अशी स्थिती आहे. ध्वज दिन निधी संकलनाचे वर्ष डिसेंबर ते ३० नोव्हेंबर असे असते. त्यामुळे ३० नोव्हेंबरच्या आत यावर्षीच्या निधीचे संकलन पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित कार्यालयाकडून पाठपुरावाही केला जात आहे.

असेआहे संवर्गनिहाय योगदान
ध्वजदिन निधीसाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून (सुपर क्लासवन) प्रत्येकी १५००, कार्यालय प्रमुख, अधिव्याख्याते प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांकडून प्रत्येकी १०००, िद्वतीय श्रेणी अधिकाऱ्यांकडून प्रत्येकी ५००, तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांकडून ३०० तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० रुपयांचे योगदान घेतले जाते.

सढळ हाताने मदत करा
^गतवर्षी अकोला जिल्ह्याने ५२ लाख ८० हजाराचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापेक्षा जास्त १०२ टक्के रक्कम संकलित झाली. यावर्षीही टारगेट पूर्ण होईल, अशी मला अपेक्षा आहे. त्यासाठी सर्व कार्यालयांना पत्रे लिहून सढळ हाताने मदत करा, असे आवाहन केले आहे.’’ जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा सैनिक कल्याण मंडळ, अकोला.

ऑगस्टपर्यंतचेच टारगेट
ध्वजदिन निधीची ९० टक्के रक्कम ऑगस्ट अखेरपर्यंतच संकलित व्हायला पाहिजे, असा दंडक आहे. त्यानंतरच्या तीन महिन्यात उर्वरित दहा टक्के रकमेची जुळवाजुळव होते. यावर्षी निम्मा ऑक्टोबर उलटल्यावरही निधीचे संकलन ७९.३० टक्क्यांच्या (४६ लाख हजार ५५ रुपये) पुढे जाऊ शकले नाही.

पुढे काय ?
ध्वज दिन निधी संकलनाचे वर्ष डिसेंबर ते ३० नोव्हेंबर असे असते. त्यामुळे ३० नोव्हेंबरच्या आत यावर्षीच्या निधीचे संकलन पूर्ण होणे गरजेचे आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने तशी मोहीमही आखली आहे. दररोज या कार्यालयातर्फे इतर कार्यालयांशी संपर्क साधून पाठपुरावा केला जात आहे.
बातम्या आणखी आहेत...