आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक वापराविरोधात नगरपालिकेने थोपटले दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बुलडाण्यात सध्या प्लास्टीकचा मोठ्या प्रमाणात वापर वाढल्याने त्याचा परिणाम निसर्गावर होत आहे. प्रदुषणास कारणीभूत असणा-या प्लास्टिक पिशव्यांच्या वापवर बंदी आणण्यासाठी नगरपालिकेने दंड थोपटले असून, घनकच-याची विल्हेवाटही शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी कंबर कसली आहे. "ग्रीन सिटी क्लीन सिटी'चा उद्देश साध्य करण्यासाठी ही बाब महत्त्वाची ठरणार असून, प्लास्टिक पिशव्या वापरणा-यावर दंडात्मक कारवाई करण्याचेही पालिकेच्या विचाराधीन आहे.
बुलडाणा शहरात १६ हजार मालमत्ताधारक आहेत. ते दरवर्षी कर भरतात. तसेच शहरालगत सुंदरखेड सागवन ही गावे असून, शहराची लोकसंख्या एक लाखावर गेली आहे. जिल्ह्याचे ठिकाण असल्याने दररोज येणा-यांची संख्या मोठी आहे. नैसर्गिक लेणे लाभलेले बुलडाणा शहर आता मात्र प्रदुषणाच्या विळख्यात सापडले आहे. मोठ्या प्रमाणात वाहनांचा वापर आणि प्लास्टिक यासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे शहर प्लास्टीकमुक्त करण्यासाठी नगरपालिका पाऊल उचलणार आहे. शहरात निघणा-या घनकच-यापासून सेंद्रीय खत निर्मितीसाठीही पावलेही उचलण्यात येणार आहेत. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याची बाबही पालिकेच्या विचाराधीन आहे.

नगरपालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातल्यास शहरातील कच-याच्या वाढत्या प्रमाणावरही आळा बसणार आहे. तसेच गंभीर होत चाललेली प्रदुषणाची समस्याही सुटणार आहे. त्या दृष्टीने नगरपालिका आगामी काळात कठोर पाऊल उचलणार असून, स्वच्छ सुंदर शहरासाठी प्रयत्न करणार आहे.

अशी लावली जाते घनकच-याची विल्हेवाट
अर्ध्याशहरातील कचरा बुलडाणा अर्बनच्या माध्यमातून उचलला जातत असून, अर्धे शहर नगरपालिका स्वच्छ करत आहे. पालिकेकडे पाच घंटागाड्या, एक बुलडोझर दोन ट्रॅक्टर आहेत.

एकात्मिक प्रकल्पाची उभारणी
जिल्ह्यातीलसर्व शासकीय, निमशासकीय, खासगी दवाखान्यातून निघणा-या जैव वैद्यकीय घनकच-याची विल्हेवाट लावण्यासाठी बुलडाणा जिल्हा मुख्यालयी एकात्मिक प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे.

खत निर्मितीचा प्रकल्पाची निविदा प्रक्रिया
घनकच-याचीविल्हेवाट लावण्यासाठी नगरपालिकेच्या मालकीच्या जुन्या वॉटर हेड वर्क्सच्या जागेत सेंद्रीय खत निर्मिती प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्या संदर्भात निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. या शिवाय जैव वैद्यकीय प्रक्रिया प्रकल्प राबवण्यासाठी निविदा प्रक्रिया करण्यात येत आहे. दोन ऑक्टोबर २०१५ पर्यंत घनकच-याची विल्हेवाट लावण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने कार्यवाही सुरू आहे.- तुकारामअंभोरे पाटील, नगराध्यक्ष

हजाराे रुपयांच्या लागतात प्लास्टिकच्या पिशव्या
प्लास्टीकपिशवीशिवाय नागरिक सामान घेत नाहीत. ही सवय गेली पाहिजे. आपल्या आयुर्वेदाच्या दुकानात येणा-या ग्राहकांना प्लास्टिक पिशवी देणे बंद केले. तरीही दर महिन्यात तीन हजार रुपयांच्या पिशव्या लागतात. तसेच जवळच्या दूध डेअरीला महिन्याच्या पंधरा हजारांच्या प्लास्टीक पिशव्या लागतात. एक पिशवी २५ पैशांची आहे. ललीतकोठारी, औषधविक्रेता, बुलडाणा

आठ हजार झाडे लावणार
शहरातीलप्रत्येक घरटी एक झाड याप्रमाणे आठ हजार झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याची योजना आहे. त्यानुसार सामाजिक वनीकरण विभाग जिल्हा रोपवाटिका अधिका-यांकडून झाडे खरेदी करण्यात आली आहेत.

प्रदुषणाचा परिणाम असा
प्लास्टीकइतर वस्तूंच्या प्रदुषणामुळे नेहमीची सर्दी, श्वसन अवस्था, दमा , अल्सर आदी आजार होतात. तसेच कार्बन डायऑक्साईड, सोडियम कार्बोनेट आदींमुळेआम्लीयुक्त पाऊस पडल्याने पिके खराब होतात.
बातम्या आणखी आहेत...