आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाशीम येथे जूनपर्यंत प्लास्टिकमुक्तीचा संकल्प, जागतिक पर्यावरणदिनी करणार संकल्पपूर्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीम - प्लास्टिकच्या पिशव्या इतर साहित्याचा वापर बंद करून वाशीम शहराला जागतिक पर्यावरण दिन अर्थात जून २०१६ पर्यंत प्लास्टिकमुक्त बनवण्याचा निर्धार करण्यात आला. यासाठी तहसील कार्यालय, नगरपरिषद शहरातील सामाजिक संघटना एकत्रितपणे प्रयत्न करणार आहेत. ‘वसुंधरा दिन’चे औचित्य साधून उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप होते.
या प्रसंगी तहसीलदार आशीष बिजवल, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले यांच्यासह मा गंगा मेमोरियल, व्यापारी मंडळ, मारवाडी युवा मंडळ, युवा व्यापारी मंडळ, राजपूत संघटन, सायकल ग्रुप, छत्रपती शिवाजी महाराज रायडर्स ग्रुप आदी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘प्लफ्टिकमुक्त वाशीम’साठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक असल्याने व्यापक स्वरुपात जनजागृती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यासाठी लेख, दृकश्राव्य माध्यमांमधून लोकांना प्लॅस्टिकचे तोटे सांगण्यात येणार आहेत. तसेच प्लॅस्टिकच्या वस्तूंना पर्यायी वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून प्लॅस्टिक पिशवीला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. या अभियानाविषयी जनजागृती करण्यासाठी मे २०१६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे अनेक गंभीर समस्या उदभवत आहेत. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून वाशीम शहर प्लास्टिकमुक्त बनवण्यासाठी प्रशासन विविध सामाजिक संघटना एकत्र येवून प्रयत्न करत आहेत.
प्लास्टिकमुक्त वाशीमसाठी व्हा सज्ज
वाशीम शहर प्लॅस्टिकमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यापूर्वीही शहरामध्ये तसा प्रयत्न झाला परंतु आता पर्यावरण दिनापर्यंत शहर प्लॅस्टिकमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यादिशने प्रयत्न झाल्यास गावातून प्लॅस्टिक हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही.