आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीकेव्हीत विद्यार्थ्याला लुटले, चाकूच्या धाकावर सोनसाखळी हिसकावली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याला दुचाकीवरून आलेल्या चार युवकांनी चाकूचा धाक दाखवत त्याच्याजवळील दोन हजार रुपये, मोबाइल सोनसाखळी हिसकावून पळ काढला. ही घटना गुरुवारी रात्री वाजताच्या सुमारास घडली.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील सारंग रामस्वरूप सोमानी (वय १७) हा युवक बीएससी अॅग्रिकल्चरचे शिक्षण घेत आहे. तो काही कामासाठी शहरात आला होता. सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास तो शास्त्रीनगरातील हनुमान मंदिराजवळून विद्यापीठातील वसतिगृहात पायी जात होता.

या वेळी पाठीमागून दोन दुचाकी येत होत्या. त्यावर चौघेजण बसले होते. त्यांनी सारंगजवळ गाडी थांबवून त्याला गाडीवर जबरदस्तीने बसवले. त्यानंतर त्यांनी त्यास विद्यापीठातील एका नाल्याजवळ नेले. दुचाकी थांबवून त्यांनी सारंगच्या पोटाला चाकू लावून त्याच्याजवळ असलेला सॅमसंग कंपनीचा मोबाइल, रोख दोन हजार रुपये आणि त्याच्या गळ्यातील सोनसाखळी, असा एकूण १७ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला.

त्यानंतर लुटारू पळून गेले. त्यानंतर युवकाने सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्या तक्रारीवरून अज्ञात चार आरोपींविरुद्ध भादंवि ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.