आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PM नरेंद्र मोदी यांनी \'मन की बात\'मध्ये या मराठा धाब्याचा केला उल्लेख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - हजार व पाचशेच्या नाेटा बंद करण्यात अाल्यानंतर प्रवाशांची गैरसाेय हाेऊ नये म्हणून ‘अाज भरपेट जेवा, पैसे नंतर केव्हाही द्या,’ अशी अाॅफर देऊन अनेकांची भूक भागवणारे अकाेला जिल्ह्यातील हाॅटेलचालक मुरलीधर राऊत यांच्या उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी रविवारी ‘मन की बात’मध्ये काैतुक केले. दस्तुरखुद्द पंतप्रधानांकडून झालेल्या काैतुकामुळे राऊत कमालीचे भारावले असून ‘अाता यापुढचे सारे अायुष्य समाजसेवेसाठीच द्यावे,’ असा मनाेदयही त्यांनी व्यक्त केला अाहे.

अाठ नाेव्हेंबर राेजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्याच दिवशी मध्यरात्रीपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे अनेकांना अनंत अडचणींना सामाेरे जावे लागले. प्रवासाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या प्रवाशांनाही खिशात (जुने) पैसे असूनही हाॅटेलात चार घास मिळणे अवघड बनले हाेते. प्रवाशांची ही अडचण जाणून अकाेला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूर या गावाजवळील ग्राम शेळद येथील हाॅटेलचालक मुरलीधर राऊत यांनी माणुसकीच्या भावनेतून एक उपक्रम अाखला. या मार्गावर त्यांचे मराठा हॉटेल आहे.

या हाॅटेलबाहेर त्यांनी एक माेठा फलकच लावला. ‘बाहेरगावच्या प्रवाशांनी अामच्या हॉटेलमध्ये येऊन पाेटभर जेवावे. पैशाची काळजी करू नका, पुढच्या वेळी याल तेव्हा कधीही पैसे द्यावे,’ असे अावाहन त्यांनी या फलकावर केले हाेते. राऊत यांनी दाखवलेल्या आैदार्यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या शेकडाे भुकेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. नोटाबंदीनंतर पहिल्या दिवसापासून त्यांनी अनेक प्रवाशांना माेफत जेवण दिले. राऊत यांच्या स्तुत्य उपक्रमाची खुद्द पंतप्रधानांनी दखल घेतली. रविवारी सकाळी ‘मन की बात’मध्ये त्यांनी मराठा हाॅटेलच्या या उपक्रमाचा उल्लेख करून मुरलीधर राऊत यांचे विशेष अभिनंदन केले.

खरं तर माझं काम खूपच छाेटं, पण अाता माेठं वाटू लागलंय!
‘महाराष्ट्र ही संतांची भूमी. एक भाकर चाैघांनी वाटून खाण्याची अापली संस्कृती. आपल्याजवळ जे आहे त्यातलं काही लोकांना द्यावं हाच उद्देश ठेवून आम्ही १६ दिवस हा उपक्रम राबवला. ‘तुम्ही या, पाेटभर जेवा. हजार-पाचशेच्या नोटांची चिंता करू नका. पुढच्या वेळी याल तेव्हा पैसे द्या,’ असे अावाहन केले. खरे तर हे काम एवढं मोठं नव्हतं, पण अाता ते खूप माेठं वाटू लागलंय. माेदी साहेबांच्या ताेंडून नाव एेकणं यापेक्षा अभिमानाची काेणतीच गाेष्ट नाही. आता पुढचं आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण करावं, अशा कल्पना डोक्यात येत आहेत. मी सामान्य शेतकरी कुटुंबातला. आईवडील अाजही शेती करतात. या काळात सुमारे पाचशे- साडेपाचशे लाेक अामच्याकडे जेवून गेले. मात्र, अाम्ही त्याची कुठेही नाेंद ठेवली नाही. त्यापैकी काही जण अाता पैसेही अाणून देत अाहेत. काही लाेक नंतरही अाणून देतील. - मुरलीधर राऊत, मालक, मराठा हॉटेल, बाळापूर
पुढील स्लाईडवर बघा, मराठा धाब्याशी संबंधीत एनडीटीव्हीने दिलेली खास स्टोरी.... एएनआयनेही घेतली होती याची दखल...
बातम्या आणखी आहेत...