आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषबाधा झालेल्या आणखी एकाचा मृत्यू, व्याळा येथे घडली होती घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्याळा- पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याच्या घटनेतील आणखी एकाचा शनिवार, मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य तिघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

नव्या माठातील पाणी पिल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना बुधवार, मार्च रोजी रात्री येथे घडली होती. यामध्ये शांताराम कृष्णाजी सोळंके (वय ५५) यांचा अकोला येथे उपचारादरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला. नव्या माठातील पाणी पिल्यामुळे रत्नकलाबाई सोळंके (वय ४५), उमेश सोळंके (वय २०), दयाराम कृष्णाजी सोळंके (वय ४५), गोपाल पवार (वय ५४) यांचीही प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, शनिवार, मार्च रोजी दयाराम सोळंके यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर तिघांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, दयाराम सोळंके यांच्यावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

पाण्यातून विषबाधा झाल्याच्या या घटनेनंतर आरोग्य विभागाने सोळंके यांच्या निवासस्थानाजवळील हातपंपाच्या पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी ते अकोला येथे पाठवले होते. मात्र, तीन दिवस उलटूनही आरोग्य विभाग आणि बाळापूर पोलिसांना या नमुन्यांसंदर्भात अहवाल मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांना तपासात अडचण येत आहे.

या प्रकरणाचा तपास ठाणेदार मिर्झा यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट, काकड, गिरी, वानखडे, शे. अब्बास आदी करत आहेत.