आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध दारूसाठ्यासह एका जणास अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू - येथील पोलिसांचा अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईचा सपाटा सुरूच असून, शुक्रवारी पळसोबढे येथे एका घरी धाड टाकून मुद्देमालासह दारू विक्रेत्यास अटक केली आहे.

पळसोबढे येथे राजू बाबुलाल गवई हे अवैधरीत्या देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती ठाणेदार भास्कर तवर यांना मिळाली होती. या माहितीवरून त्यांनी ३१ जुलै रोजी पोलिस
उपनिरीक्षक जयसिंग पाटील, हेडकॉन्स्टेबल मनोहर इंगळे, जनार्दन चंदन, हरीश सातव यांना पळसोबढे येथे पाठवले. या पथकाने आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास राजू गवई याच्या
घरी धाड टाकली असता त्याच्या घरामध्ये सव्वा सहा हजार रुपयांच्या देशी दारूच्या १२५ बॉटल्स आढळून आल्या. पोलिसांनी या बॉटल जप्त करत राजू गवईला अटक केली.
उरळ पाेलिसांनी राबवली अंत्रीसह परिसरात मोहीम
पोलिसांच्या अाशीर्वादाने अंत्री येथे मागील अनेक दिवसांपासून गावठी दारू विक्रीला ऊत आल्याचे वृत्त दैनिक दिव्य मराठीने प्रकाशित करताच पोलिसांची झोप उडाली असून,
उरळ पोलिसांनी अखेर अंत्री या गावात पथकासह धाव घेत गावठी दारू विक्रेत्यांची शोध मोहीम सुरू केली आहे. पोलिसांच्या या मोहिमेमुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. ही शोध मोहीम अद्यापही सुरूच असून, यादरम्यान पोलिसांना गावठी दारू काढणारे आढळून आले नसले, तरी अनेक ठिकाणी दारूचे रिकामे डबे आढळून आले आहेत. पोलिसांनी या डब्यांची तोडफोड केली आहे. या मोहिमेमुळे दारू विक्रेत्यांमध्ये धडकी भरली आहे, तर दारू पिणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच पोलिसांनी उशिरा का होईना दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यास प्रारंभ केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.