आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकल चोरट्यास पोलिसांनी पकडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शाळकरी मुलांच्या सायकली चोरायच्या आणि त्या विकण्याचा गोरखधंदा करणाऱ्या चोरट्यास सिव्हिल लाइन्स पोलिसांनी शनिवारी पकडले. शहरातून सायकली चोरीला जाण्याच्या घटना दररोज घडतात. मात्र पोलिस ठाण्यात रिपोर्ट देण्यासाठी गेले तर पोलिस चोरीला गेलेल्या वस्तुचे बील मागतात. मात्र सायकलीचे बील कुणी सांभाळून ठेवत नसल्यामुळे अशा घटनांची नोंद तुरळकच होते. अशीच तक्रार सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गेल्या महिन्यात करण्यात आली होती. 
 
एका शाळकरी मुलाची सायकल शाळेसमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या प्रकरणाचा शोध घेत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात त्यांना भूषण चौधरी नामक युवक दिसून आला. त्याला पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. त्याने पोलिसांना चोरीची कबुली दिली असून सायकली परस्पर विकल्याचेही पोलिसांना सांगितले आहे. आता पोलिस चोरीच्या सायकली विकत घेणाऱ्याचा शोध घेत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...