आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police, Citizens Coordination Preventing Crime Through Jansetu

पोलिस, जनतेच्या समन्वयातून गुन्हेगारी रोखण्यासाठी 'जनसेतू'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : जिल्हा पोलिस अधीक्षक मीणा यांनी जनसेतूबाबत पत्रकारांसोबत संवाद साधला.
अकोला - पोलिस जनतेत संवाद घडवून गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आपण १० समित्या स्थापन केल्या आहेत. त्याला 'जनसेतू' असे नाव दिले आहे. या समित्यांमध्ये शेतकऱ्यांची समिती बनवण्यात येणार आहे. या जनसेतू योजनेचा शुभारंभ अमरावती परिक्षेत्राचे महानिरीक्षक यांच्या हस्ते रविवारी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी दिली. ते शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

चला एकत्र विकासाच्या दिशेने' ही संकल्पना पहिल्यांदा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी राबवण्याचा संकल्प केला आहे. पोलिस मित्र संकल्पनेत भर घालून या मोहिमेला विस्तृत करण्यासाठी त्यांनी १० समित्यांची स्थापना केली आहे. सामान्य माणसांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातील काही समस्या पोलिस प्रशासनाशी निगडित असतात त्या कित्येकदा पोलिस प्रशासनापर्यंत पोहोचत नाहीत. त्यासाठी पोलिस जनता यांच्यामधील दुरावा कमी करण्याचा जनसेतू हे माध्यम आहे. जनतेशी सुसंवाद साधण्यासाठी समाजातील विविध घटकांना एकत्रित करून त्यांच्या समित्या बनवण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी दिली.

घटना घडल्यानंतर ती टाळण्यासाठी समित्या या महत्त्वाची भूमिका बजावू शकतील. पोलिसांप्रति त्यांच्या मनात भीती राहणार नसल्यामुळे ते थेट पोलिसांना माहिती देतील अनुचित प्रकार थांबवता येईल, असेही ते या वेळी म्हणाले. पत्रकार परिषदेला अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनोने यांची उपस्थिती होती.

शेतकरी सबलीकरणासाठी चर्चासत्र : जनसेतूया योजनेच्या माध्यमातून पोलिस अधीक्षकांनी शेतकरी सबलीकरण, महिला सशक्तीकरण, पोलिस जनता संबंध या विषयांवर पहिल्यांदाच चर्चासत्राचे आयोजन केले आहे. ३० नोव्हेंबरला संध्याकाळी ते वाजेदरम्यान पोलिस मुख्यालयातील सभागृहामध्ये आणि याच वेळी पातूर पोलिस ठाण्यामध्ये चर्चासत्राचे आयोजन केले आहे. अशा प्रकारचे चर्चासत्र पोलिस विभाग पहिल्यांदाच राबवत आहे.

चित्रकला,तणावमुक्ती शिबिराचेही आयोजन : ३०नोव्हेंबर रोजी चित्रकला स्पर्धा ते १२ आणि १३ ते १६ वयोगटासाठी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत पोलिस मुख्यालयातील सभागृहात आयोजित केली आहे, तर वाहतूक नियमन कार्यशाळा ३० नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान अकोला शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये घेण्यात येणार आहे. अकोट शहर पोलिस ठाण्यात डिसेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी वाजेपर्यंत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.

असे असेल समितीचे काम : डॉक्टर्सशास्त्रज्ञांची समिती पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या क्लिष्ट गुंतागुंतीच्या गुन्ह्यांमध्ये तपासाचे दृष्टिकोनातून शास्त्रीय तांत्रिक मदत करेल. संगणक तज्ज्ञ समिती सायबर क्राइममध्ये मदत करेल, पेट्रोलिंग समिती पोलिसांवरील कामाचा ताण कमी व्हावा म्हणून पोलिसांच्या विविध कामांमध्ये मदत करेल, वकील समिती ही क्लिष्ट गुंतागुंतीच्या संवेदनशील गुन्ह्यांमध्ये मार्गदर्शन करणार आहे.

अशा आहेत समित्या

>डॉक्टर्स शास्त्रज्ञ समिती
>संगणक तज्ज्ञ समिती
>महिला सुरक्षा सशक्तीकरण समिती
>जातीय सलोखा समिती
>पेट्रोलिंग समिती
>ज्येष्ठ नागरिकांची समिती
>शेतकरी समिती
>वकील समिती
>व्यापारी वाहतूकदार समिती
>रहदारी नियंत्रण समिती

पोलिस करणार गावांत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे त्यांचे पुनर्वसन करून त्यांच्या सर्वांगीण विकासासंबंधी सर्वतोपरी मदत करण्यासाठी शेतकऱ्यांची समिती स्थापन केली आहे. गावागावांमध्ये कौटुंबिक वाद, शेतीचे वाद, भावाभावांमधील भांडणे, अशा अनेक घटना घडत असतात. त्याबद्दल पोलिस पहिल्यांदाच एका गावातील पाच शेतकरी, शेतमजूर यांची निवड करून समिती बनवणार आहे. या समितीच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात येइल.