आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच घेताना पोलिस कॉन्‍स्‍टेबल एसीबीच्‍या जाळ्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला – कौटुंबिक वादात गुन्‍हा दाखल न करण्‍यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागणारा मूर्ति‍जापूर पोलिस कॉन्‍स्‍टेबल आज (सोमवार) सायंकाळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या (एसीबी) जाळ्यात अडकला. महेंद्र रुपने असे त्‍या लाचखोर पोलिसाचे नाव आहे.
हुंड्यासाठी सासरकडील लोक छळ करत असल्‍याची तक्रार एका विवाहितेने दिली होती. या प्रकरणात तिच्‍या पतीच्‍या मामा-मामीवर गुन्‍हा दाखल न करण्‍यासाठी हेड कॉन्‍स्‍टेबल रुपने याने 50 हजार रुपयांची मागणी केली. दरम्‍यान, 10 हजार रुपये देण्‍याचे ठरले. या बाबत संबंधितांनी एसीबीकडे तक्रार गेली. रुपने याला लाचेची रक्‍कम घेताना एसीबीच्‍या पथकाने रंगेहात अटक केली. त्‍याच्‍या विरोधात शहर कोतवाली पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल केला आहे.