आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन युगुल पोलिसांच्या ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मुलीला कायद्यानुसार सज्ञान होण्यास एक महिना कमी आणि तिचा प्रियकर तिच्यापेक्षा लहान आहे. हे दोघेही दोन दिवसांपूर्वी घरून पळून गेले होते. दोन दिवसांतच ते घरी परतले. मात्र, मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. प्रेमीयुगुल हे जुने शहरातील अाहे.
मुलगा १७ वर्षाचा अन् मुलगी १७ वर्षे ११ महिन्याची. हे दोघेही जुने शहरामध्ये शेजारी-शेजारी राहतात. या दोघांमध्ये सूत जुळले. त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या आणि आताच आपले लग्न होणार नाही म्हणून घर सोडण्याचा निर्णय घेतला. दोघेही गुरुवारी नागपूरला गेले. तेथे त्यांनी एक दिवस मुक्काम केला. इकडे मुलीचे आईवडील चिंताग्रस्त झाले. त्यांनी जुने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते दोघेहीशनिवारी सकाळी अकोल्यात परतले. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले. या वेळी मुलीच्या मुलाच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावले. मुलाच्या वडिलांनी मुलगा सज्ञान झाल्यानंतर या दोघांचे लग्न करण्यास संमती दर्शवली, तर मुलीच्या वडिलांनी विरोध केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि ३६३, ३६६ अन्वये गुन्हा दाखल केला असून, मुलीची वैद्यकीय तपासणी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...