आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Do Their Work As Army Police Superintendent Chandra Kishor Mani

सैनिकाप्रमाणेच रक्षकाचे कार्य - पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सैन्यातील जवानाप्रमाणेच सुरक्षा रक्षकाला भूमिका बजवावी लागते. त्यामुळे अनेक प्रतिबंधित क्षेत्र सुरक्षित असतात, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी केले. पोलिस उदय दिनानिमित्त जानेवारी रोजी सकाळी १० वाजता पोलिस मुख्यालयात मनोरंजन सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते.

प्रारंभी पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांच्या हस्ते कार्यशाळेचे दीपप्रज्वलन करण्यात आले. अकोला जिल्हा पोलिस दलातर्फे आयोजित या कार्यशाळेस दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र, आकाशवाणी, दूरसंचार विभाग, पारस येथील थर्मल पॉवर स्टेशन, हिंदुस्थान डिझेल पेट्रोल डेपो, इंडियन ऑइल कार्पोरेशन, गायगाव येथील भारत पेट्रोलियम डेपो, अकोला येथील मायक्रो व्हेव स्टेशन, अकोला, तेल्हारा, मूर्तिजापूर हिवरखेड येथील वीज उपकेंद्र, शिवणी विमानतळ, अग्निशमन दल तसेच शासकीय महाविद्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक तसेच खासगी सुरक्षा व्यवस्थापक सुरक्षा रक्षक या वेळी उपस्थित होते.

या वेळी पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी मर्मस्थळे इतर महत्त्वाच्या ठिकाणच्या सुरक्षेच्या अनुषंगाने माहिती दिली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सहभाग घेणाऱ्या सजग जागरूक नागरिकांना राज्य शासनाच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या निर्भय पुरस्काराबाबतही माहिती दिली.

अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, शहरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप चव्हाण, दहशतवादविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक मनीष पाटील, सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी उपस्थितांना सुरक्षेबाबत घ्यावयाची दक्षता करावयाच्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच सुरक्षा रक्षकांनी एखाद्या संकटातून सुटका कशी करून घ्यावी याबाबतही मार्गदर्शन केले. घातपातविरोधी पथकातील पोलिस हवालदार मोहन फरकाळे त्यांच्या पथकाने घातपातासंबंधी माहिती देऊन नवीन यंत्र सामग्रीसंदर्भात प्रात्यक्षिक करून दाखवले.
सुरक्षाएजन्सीने वॉच ठेवावा : सुरक्षारक्षकाला नेमणूक देताना त्याची पूर्ण माहिती काढून घ्यावी. नंतरच त्याला नेमणूक द्यावी. सुरक्षा रक्षक प्रामाणिकपणे ड्यूटी करताहेत की नाही, याची दक्षता एजन्सीने घ्यायला हवी. बरेचदा एटीएम उघडे ठेवून सुरक्षा रक्षक बाहेर गेलेले असतात. असे होणार नाही याची काळजी घ्यावी.