आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोड्याचे सत्र सुरुच; डीबीस्कॉडची कानउघाडणी, शहरातील पाेलिस रस्त्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यात घरफोड्याचे सत्र सुरुच आहे. ठाणेदार डीबीस्कॉडचा धाक राहिला नसल्याने या घटना घडत असल्याचे वास्तव दिव्य मराठीने सोमवारच्या अंकात मांडले होते. त्यावर अॅक्शन म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सोमवारी सकाळी तातडीने शहरातील सर्व ठाणेदार डिबीस्कॉडमध्ये असलेल्या पोलिसांना पाचारण करून कानउघडणी केली. यापुढे चोरी लुटमारीच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत, अशी तंबी त्यांनी दिल्याची माहिती आहे. 
 
महिन्याभरापासून जिल्ह्यात चोरट्यांनी उच्छाद मांडला. शहरात तर दररोज घडफोडीच्या घटना घडत आहेत. या घटनांना प्रतिबंध घालण्यात पोलिसांना अपयश आले आहे. डीबीस्कॉड केवळ नावालाच असून त्यांच्या ठोस कारवाया नाहीत. त्यांच्यावर ठाणेदारांचा अंकुश नाही तसेच त्यांच्याकडून काम करून घेण्यात अधिकारी अपयशी ठरल्याचे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या घटनांवरून दिसून येते. जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकच कारवाया करीत आहेत. मात्र पोलिस ठाण्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. सोमवारी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी शहरातील सर्व पाेलिस ठाण्याचे ठाणेदार, डीबीस्कॉडचे पोलिस कर्मचारी सर्व बीएम यांना बोलावून सूचना दिल्या. त्यांचा वर्ग घेत त्यांच्या कामकाजाविषयी सुधारणा करण्याचे सांगून, अचानक चोरीच्या घटना वाढल्याच कशा याबद्दल विचारणा केली. त्यासाठी गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या. 
 
एकाही अपार्टमेंटमध्ये नव्हते सीसीटीव्ही 
दिवसाफोडण्यात आलेल्या एकाही अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. नागरिकांनी वर्गणीतून अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले तर अशा घटनांना आळा बसेल. ज्या अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, अशीच अपार्टमेंट चोरट्यांनी टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याच त्यांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही. 
 
वैद्यकीय अधिकारी शामराव हिरुळकर यांचे घर फोडले 
रविवारी खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी चार घरे फोडली होती. त्यातून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असलेल्या भारती शामराव हिरुळकर यांचे घरात चोरट्यांनी चोरी केली. हिरुळकर या ड्युटीवर गेल्या होत्या तर मुलांना बहिणीकडे सोडले होते. दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घरातील ४५ हजार रुपये रोख चांदीच्या तोरड्या सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकून ६६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. 
 
रात्रगस्त असल्याने दिवसा चोऱ्या 
रात्रगस्त प्रभावी असल्याने चोरटा हा शक्यतो पोलिसांच्या नजरेत येतो. तर दिवसा चोरी केल्याने पोलिसांच्या नजरेत येण्याचा प्रश्न नाही. म्हणून गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी दिवसाच घरे फोडण्याचा सपाटा लावला आहे. त्यावर पोलिस काय उपाययोजना करतात हे येणाऱ्या काळात दिसून येणार आहे. 
 
ठाणेदारांसह पोलिस उतरले होते रस्त्यावर 
पोलिस अधीक्षकांनी ठाणेदार डीबीस्कॉडचे कान उपटल्यानंतर सोमवारी ठाणेदार रस्त्यावर उतरले होते. त्यांनी नाकाबंदी करीत संशयित वाहनांची कसून चौकशी केली. सोमवारसारखी नाकाबंदी नियमित सुरु राहील काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. 
बातम्या आणखी आहेत...