आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस भरतीतील एका तोतयासह चौघांवर अखेर गुन्हे दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पोलिस शिपाई भरतीचा लेखी पेपर देणाऱ्या एका तोतया उमेदवारासह चौघांवर अखेर बुधवारी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. लेखी पेपर देण्यासाठी तोतया उमेदवाराने संबंधिताकडून दाेन लाख रुपये घेतल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, फरार एका आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. विशेष म्हणजे जिल्हा पोलिस भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे सर्वप्रथम "दिव्य मराठी'ने उजेडात आणले होते.
लेखी परीक्षेसाठी ११५० उमेदवार पात्र झाले होते. या उमेदवारांचा लेखी पेपर १२ एप्रिल रोजी सकाळी वाजता घेण्यात आला होता. औरंगाबाद तालुक्यातील जोडवडी येथील राजू रामलाल बहुरे हा मैदानी परीक्षा उत्तीर्ण झाला होता. मात्र, लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी त्याने दोन लाख रुपये देऊन एमपीएससीची तयारी करणारा विद्यार्थी विठ्ठल त्र्यंबक सिसोदे रा. निहालसिंगवाडी ता. अंबड जि. जालना याला पेपर देण्यासाठी राजी केले. विठ्ठलने राजू बहुरेचे बनावट ओळखपत्र तयार केले. १२ एप्रिलला लेखी पेपरसाठी सकाळी वाजता विठ्ठल परीक्षेच्या स्थळी पोहोचला. प्रवेशद्वारावर त्याने दोन ठिकाणी रजिस्टरवर सह्या केल्या पेपरही लिहिला. त्यात तो ६२ गुण घेऊन उत्तीर्ण झाला. परीक्षा झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात शंका आली. मैदानी परीक्षेसाठी एक उमेदवार त्याच नावाचा लेखी परीक्षेसाठी दुसरा उमेदवाराचा चेहरा आढळून आल्याने बिंग फुटले पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली. बहुरेच्या गावातीलच संदीप इंदर जाधव कल्याणसिंग अंबरसिंग बमनावत या दोघांनी त्याला मदत केली. या चौघांविरुद्ध गृह पोलिस उपअधीक्षक अरविंद पाटील यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४१७, ४१९,४२०,४६४,४६५,४६८,४७१ सहकलम महाराष्ट्र प्रीव्हेंशन ऑफ माल प्रॅक्टिस अँड युनिव्हर्सिटी बोर्ड ऑफ अदर स्पेसिफाइड एक्झामिनेशन अॅक्ट १९८२ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस भरतीत गैरव्यवहार केल्याचे राज्यात रत्नागिरी, बीड, पुसद या ठिकाणीही पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी कुणाच्या तक्रारीवरून नव्हे, तर त्यांना संशय आल्यामुळेच त्यांनीच परीक्षा झाल्यानंतर सीसीटीव्ही पडताळणीचे आदेश दिले होते. ते स्वत: हे प्रकरण हाताळत असून, दोषींवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जितेंद्र सोनवणे करत आहेत.
सुरुवातीपासूनच बहुरेवर होता संशय
मैदानी परीक्षेसाठी कागदपत्रांची तपासणी केली तेव्हाच राजू बहुरे याच्या प्रमाणपत्रावर निवासी जिल्हाधिकाऱ्यांचा शिक्का बनावट असल्याचा संशय आला होता. तेव्हापासून त्याच्यावर नजर होतीच. अखेर तोच सीसीटीव्हीच्या जाळ्यात अडकला.

पोलिस अधिकाऱ्यांना क्लीन चिट
लेखी परीक्षेत तोतया उमेदवाराने प्रवेश कसा केला? सीसीटीव्हीची नजर कशी चुकवली? प्रवेशद्वारावरील दोन पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांसमोर विठ्ठल सिसोदे याने सह्या केल्या. परीक्षा प्रवेशपत्र पाहिल्यावरही अधिकाऱ्याच्या कसे लक्षात आले नाही? उमेदवाराला मदत करणारे लेखी परीक्षेस प्रवेश देणारे आरोपी कसे होत नाहीत, असे प्रश्न उपस्थित होत असून, अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिल्याची चर्चा आहे.

आरोपी वाढण्याची शक्यता : मैदानीलेखी परीक्षा देणाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांकडून अहारोत्र सुरू आहे. आणखीही उमेदवारांवर संशय असल्याची माहिती आहे. दोन-तीन दिवसांत आणखी दोषी आढळण्याची शक्यता असल्याने आरोपी वाढण्याची शक्यता आहे.
अटक करण्यात आलेले तीन आरोपी.