आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेगावात 8 लॉजवर पोलिसांचा छापा; अश्लिल चाळे करताना आढळले 28 युवक-युवती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेगाव- शहरात शनिवारी १६ सप्टेंबरला मध्यरात्री पोलिसांनी आठ लॉजवर छापे मारून अनैतिक देह व्यापार करणाऱ्या ५० ते ६० युवक युवतींना पकडले. जिल्हा पोलिस अधीक्षक शशीकुमार मीना यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. 

पोलिसांनी शनिवारी १६ सप्टेंबरला मध्यरात्री शहरातील आठ लॉजेसची झडती घेतली. या झडतीत २८ तरूण मुली अश्लिल चाळे करताना आढळले. पोलिसांनी त्यांना पकडून त्यांची कसून चौकशी केली. त्यामधील २८ मुलांवर कलम ११० ११७ अंतर्गत कारवाई केली, तर २५ ते ३० मुलींना समज देऊन सोडून दिल्याची माहिती उप विभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी दिली. या दरम्यान गोपाल गेस्ट हाऊसवर पिटा कायद्यांतर्गत कारवाई केली. गोपाल गेस्ट हाऊस येथे संजय मोहोड पाटील, गोपाल रमेश उमाळे रा.शेगाव हे चिखलीतील महिलेमार्फत मुलींना देहविक्रय करावया लावून वेश्यागृह चालवतात, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांना मिळाल्यावरून पोलिसांनी स.पो.नि.निखिल फटींग, पो.उप.नि.भास्कर तायडे, पोलिस कर्मचारी, आर.सी.पी.चे कर्मचारी यांच्यासह गोपाल गेस्ट हाऊस येथे मध्यरात्रीछापा मारला असता तेथे चिखलीतील मुली पुरवणारी एक ३४ वर्षाची महिला आढळली. तिला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर संजय मोहोड पाटील, गोपाल रमेश ऊमाळे यांच्या मार्फत गोपाल गेस्ट हाऊस येथे देहविक्रय करीता मुली पुरवण्याचे काम करते, असे तिने सांगितले. 

चिखली येथील २३ वर्षाची मुलगी निमकर्दा येथील २५ वर्षाची मुलगी या दोघांच्या सांगण्यावरून या गेस्ट हाऊसवर आणल्याचे तिने कबुल केले. मुलींना गेस्ट हाऊस येथे आणल्यानंतर दोन मुलांना आमच्या समोर आणले रात्रीचा सात हजारात सौदा झाल्याचेही तिने सांगितले. त्यानंतर मुलीला रूममध्ये पाठवण्यास लॉज मालकाने कळवले. या वरून पोलिसांनी रूमची झडती घेतली असता रूममध्ये भागवत किसन दांडगे वय २३ रा.हिवरा बु. हा मुलगा वेश्यागमन करीत असल्याचे आढळले. रूममध्ये निमकर्दा येथील मुली सोबत चेतन दिलीप जामोदकर वय २४ रा.पारस जि.अकोला हा अश्लिल चाळे करताना आढळला. फिर्यादी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या तक्रारीवरून आरोपी गोपाल रमेश उमाळे रा.शेगाव, संजय मोहोड पाटील रा.शेगाव, भागवत किसन दांडगे रा.हिवरा बु., चेतन दिलीप जामोदकर रा.पारस, सुनीता शिवाजी आवारे रा.चिखली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून,पुढील तपास एपीआय संजय अढाव हे करीत आहे. 

लॉज मालकांनी नियम अटींचे पालन करावे 
शहरातील लॉज मालकांनी नियम अटींचे पालन करून लॉजमध्ये राहायला येणाऱ्यांना खोल्या द्याव्यात जेणेकरून अशा कारवाईला सामोरे जावे लागणार नाही. पोलिस अधीक्षक शशीकुमार मीणा यांच्या मार्गदर्शनात आठवड्याला लॉजेसची तपासणी करणार असल्याचेही डीवायएसपी प्रदीप पाटील यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...