आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिप्सीचे दोर खेचताच एसपी मीणा यांचे डोळे पाणावले, निरोप देण्याची अनोखी परंपरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मुलगी जेव्हा सासरी जाते, तेव्हा तिच्या नातेवाईकांच्या ज्या भावना असतात, त्याच भावना सोमवारी सकाळी १०.३० वाजता पोलिस मुख्यालयाने अनुभवल्या. कारण होते जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांना निरोप देण्याचे. 
 
प्रथा परंपरेनुसार पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना खुल्या जिप्सीत उभे केले अन् तिला बांधलेले दोरखंडाने जिप्सी खेचू लागले. ही जिप्सी जेव्हा पोलिस मुख्यालयातून बाहेर आली. तेव्हा चंद्र किशोर मीणा यांचे डोळे डबडबले होते, तर त्यांना पाहून सर्वच भावूक झाले होते. 
 
दोन वर्षे आठ महिन्यांचा कार्यकाळ मीणा यांनी पूर्ण केला. त्यांची बदली नांदेड येथे झाल्याने त्यांना सोमवारी भावपूर्ण वातावरणात कार्यमुक्त करण्यात आले. शिस्तीच्या खात्यात निरोप समारंभाला फार महत्त्व असते. पोलिस प्रमुखांना निरोप देण्याची अनोखी परंपरा पोलिस खात्यात आजतागायत सुरु आहे. सजवलेल्या खुल्या जिप्सीतून निरोप घेण्याची इच्छा नसल्याचे मीणा यांनी आधीच सांगून टाकले होते. 
 
मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांचे ऐकून ऐकल्यासारखे करून सकाळीच परेड झाल्यानंतर जिप्सी सजवली. या जिप्सीत मिणा यांना उभे केले. अन् अप्पर पोलिस अधिक्षक विजयकांत सागर, उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील, प्रिया पाटील सर्वच पोलिस अधिकाऱ्यांनी दोन्ही दिशेने दोर धरला ते खेचू लागले.
 
जिप्सि आपले पोलिस बांधव खेचू लागताच मिणा यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना निरोप घेताना अश्रू अनावर झाले. त्यांना पाहून पोलिस अधिकाऱ्यांपासून तर सर्वच पोलिस कर्मचाऱ्यांचेही डोळे पाणावले होते. पोलिस अधिक्षकांच्या सर्वाधिक जवळ असलेले पोलिस निरीक्षक प्रमोद काळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी चंद्रकिशोर मिणा यांना बाहेरून कठोर तर आतून मऊ असे म्हणून नारळाची उपमा दिली. 
 
परंपरा इंग्रजकालीन 
पोलिसखाते हे शिस्तीचे खाते. आज संरक्षण खात्यातच शिस्त अनुभवाला मिळते. अधिकारी कितीही कठोर असले तरी त्यांच्याविषयीचा पोलिसांचा ऋणानुबंध कायम असतो. बदली झाल्यानंतरही आपल्या अधिकाऱ्याविषयी जेव्हा पोलिस कर्मचारी चांगले बाेलतात. 
 
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, फोटोज...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...